शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडाभवनचा भूखंड जमा

By admin | Updated: June 25, 2017 03:49 IST

पालघरचे नविनयुक्त उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी विकास गजरे यांनी पालघर तहसील कार्यालायसमोर असलेली सर्व्हे नं ४८ मधील ३ हजार ७०० चौरस

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पालघरचे नविनयुक्त उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी विकास गजरे यांनी पालघर तहसील कार्यालायसमोर असलेली सर्व्हे नं ४८ मधील ३ हजार ७०० चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारलेल्या क्रीडा भवन क्लबची जमीन अभिलेखात नोंद नसल्याचे सांगून ती जमीन सरकार जमा करण्याचे आदेश दिल्याने त्यात सुरु असलेली सर्व कार्यालये बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पालघर (नवली) मधील सर्व्हे नंबर ४८/अ/१/१/१ क्षेत्र ०.३७.० आकार ०.५० ची जमीन अधिकार अभिलेखात प्रेसिडेंट क्र ीडाभुवन क्लब, पालघर या नावाने १/८/१९२९ पासून दाखल असून ही जमीन बिनशेती प्रयोजनासाठी जरूर लागे पर्यंत देण्यात आली होती. मात्र या प्रकरणातील या क्लब बाबतीत महसूल दप्तरी कोणताही फेरफार अभिलेखात असल्याचे उपजिल्हाधिकारी यांना आढळून आले नाही. या प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी व नगर रचनाकार ठाणे यांनी या इमारत बांधणीसाठी परवानगी देताना सातबाऱ्याचा त्यापूर्वी तपास करणे गरजेचे असताना तो करण्यात आलेला नाही. तदनंतर या जागेवर पालघर क्रीडा भवन या नावाने भव्य इमारत उभी करून त्यात इन डोअर खेळ, व्यायाम शाळा, स्पेशल क्लब, वाचनालय इ. सुविधा निर्माण करण्यात येणार होत्या. मात्र अशा कुठल्याही सुविधा निर्माण न करता इमारतीच्या प्रथम दर्शनी भागातील तळमजल्यावर व्यापारी गाळे ठराविक लोकांना ९९ वर्षांच्या करारावर देण्यात आले होते. यातून मिळणाऱ्या पैशांचा दुरुपयोग होत असल्याचे सांगून मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याची तक्रार भाजपच्या लक्ष्मीदेवी हजारी यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र या आदेशाच्या अभिलेख निर्मिती साठी महसूल दप्तरी फेरफार झाल्याबाबतच्या नोंदी उपलब्ध नाहीत किंवा क्रीडा भवनाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांने ही बाब महसूल दप्तरी कळवली नाही. त्यामुळे ही जमीन महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम १९७१ मधील १५ (२)नुसार त्यांच्या कडून काढून घेण्यास निकषानुसार पात्र ठरल्याचे नमूद करून उपजिल्हाधिकारी गजरे यांनी ही जमीन सरकारकडे जमा करण्यात येत असल्याचे आदेश दिले. त्यामुळे ही इमारत व त्यामध्ये सुरु असलेली अनेक कार्यालये, दुकाने बंद पडण्याची शक्यता आहे.कशामुळे दिला गेला? हा आदेशमहाराष्ट्र शासन विरु द्ध क्र ीडा भवनाचे अध्यक्ष, सचिव, चिटणीस विजय घरत व मुख्याधिकारी पालघर नगर परिषद असा दावा उपजिल्हाधिकाऱ्यांपुढे सुरु होता. यावेळी क्र ीडा भवनाचे पदाधिकारी व तक्रारदार उपस्थित होते. गजरे यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्या नंतर तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्या अहवालानुसार क्रीडा भवना करीता दिलेली जमीन अशी नोंद होती. परंतु तशी नोंद महसूल दप्तरी आढळली नाही.