शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात मुबलक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 01:05 IST

अतिवृष्टी, पुरामुळे उभे पीक वाहून गेले, तर अवकाळी पावसाने नष्ट केले.

सुरेश लोखंडे ठाणे : अतिवृष्टी, पुरामुळे उभे पीक वाहून गेले, तर अवकाळी पावसाने नष्ट केले. यामुळे यंदाचा खरीप हंगाम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानदायक ठरला. मात्र, यावर मात करून रब्बी हंगाम लाभदायक ठरवण्यासाठी एक हजार ४४४ हेक्टर रब्बी पिकांची लागवड होत आहे. तर, सात हजार ५०० हेक्टर शेतात परदेशात निर्यात होणारी भेंडी, ढोबळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे.भाजीपाला या नगदी पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी सात हजार ५०० हेक्टरवर तो घेतला जात आहे. याशिवाय, आदिवासी शेतकºयांच्या ७५० एकरांवर ढोबळी मिरची, भेंडीलागवड करण्याचे नियोजन आहे. यापैकी शहापूर तालुक्यात ४५० एकर व मुरबाड तालुक्यात ३०० एकर क्षेत्रावर आदिवासींकडून भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचे नियोजन आहे. या उत्पादनासह गळीत धान्यदेखील यंदा जिल्ह्यातील शेतकरी घेणार आहेत. त्यासाठी कृषी विभागाने दूर दृष्टिकोन ठेवून भाताच्या जमिनीत एसबी-एक्सआय या वाणाचा भुईमूगदेखील १३७ हेक्टरवर पेरला जाणार आहे. यासाठी ८२.२० क्विंटल बियाण्यांची मागणी महाबीजकडे केली आहे. याशिवाय, राहुरी कृषी विद्यापीठाकडे २०५.५० लीटर द्रवरूप रायझोबियनची मागणी नोंदवली आहे. जिल्ह्यातील २५० हेक्टर शेतजमिनीत भुईमूग घेण्यासाठी १२८ क्विंटल बियाणे शेतकºयांना मोफत दिले जात आहे. तर, हरभºयाच्या उत्पादनासाठी एक हजार ४४४ हेक्टर शेतजमिनीवर पेरणी होणार आहे. त्यासाठी लागणाºया ८६६.४० क्विंटल बियाण्यांचे वाटप शेतकºयांना मोफत दिले जात आहे.>जैविक खतासह बियाण्यांचे वाटप सुरूअतिवृष्टी, पूर आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या या ७७ हजार शेतकºयांना भुईमूग, हरभरा बियाण्यांसह बीजप्रक्रिया करण्यासाठी द्रवरूप रायझोबियम हे जैविक खत १०० टक्के मोफत दिले जात आहे. राष्टÑीय अन्नसुरक्षा अभियानाद्वारे कडधान्य ५१५ हेक्टरवर घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ३०९ क्ंिवटल बियाण्यांचे वाटप आहे. भात पडच्या ४१७ हेक्टर शेतातील पेरणीसाठी २५० क्ंिवटल आणि भातबियाणे साखळी विकसित करणे, हरभरा या योजनेतून ५१२ हेक्टरसाठी ३०७ क्ंिवटल हरभरा बियाणेवाटप करण्याचे नियोजन आहे. कृषी विभागाकडून तीन लाख रुपयांच्या निधीसह जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून दोन लाख आणि जिल्हा नियोजनकडून एक लाख आदी सहा लाख रुपयांच्या निधीतून मका बियाण्यांची खरेदी करून मोफत दिले जात आहे. यातून पाच हजार ५८० टन जनावरांचा चारा तयार होणार आहे.>यंदा रब्बीसाठी पोषक हवामानजिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १४६.६० टक्के पाऊस पडला आहे. यामुळे रब्बी व उन्हाळी पीक घेण्यास सध्याचे हवामान सुयोग्य आहे. मुबलक पाणी आहे. याशिवाय यंदा थंडी मोठ्या प्रमाणात पडणार असल्यामुळे रब्बी हंगामासाठी वातावरण पोषक आहे. कृषी व महसूल विभागाद्वारेएक हजार २० वनराई बंधारे बांधले जाणार आहे. तर, जिल्हा परिषदेने साडेचार हजार बंधारे बांधण्यास प्रारंभही केला आहे. यामुळे नदी, नाल्याच्या पाण्याचे संवर्धन रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरत आहे. यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन जोमाने होण्यास वातावरणाची साथ लाभणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी लोकमतला सांगितले.