शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

पालिकेच्या मैदानात पार्र्किं ग; कोणार्कला दंड

By admin | Updated: August 27, 2015 00:31 IST

महापालिकेची मैदाने घंटागाड्या पार्किंगसाठी विनापरवाना वापरल्याप्रकरणी कोणार्क कंपनीला १ कोटी ८२ लाखांचा भुर्दंड बसला आहे. तसेच मैदानातून गाड्या हलविण्याचे आदेश

उल्हासनगर : महापालिकेची मैदाने घंटागाड्या पार्किंगसाठी विनापरवाना वापरल्याप्रकरणी कोणार्क कंपनीला १ कोटी ८२ लाखांचा भुर्दंड बसला आहे. तसेच मैदानातून गाड्या हलविण्याचे आदेश उपायुक्त नितीन कापडनीस यांनी काढले आहेत.उल्हासनगर महापालिकेने शहरातील कचरा उचलण्याचा ठेका कोणार्क कंपनीला दिला आहे. दोन वर्षांपासून कंपनी कचरा उचलण्याच्या गाड्या दसरा मैदान, गोल मैदान, व्हीटीसी मैदान व सपना गार्डन येथे विनापरवाना पार्किंग करीत आहे. पार्किंग केलेल्या गाड्या हटविण्याचे आदेश पालिकेने देऊनही त्याकडे कंपनीने दुर्लक्ष केले आहे. अखेर, उपायुक्त नितीन कापडनीस यांनी दरमहा ९ लाख १२ हजारांप्रमाणे २० महिन्यांचे १ कोटी ८२ लाखांचे भाडे आकारले आहे. आता भाडे रद्द करण्यासाठी कंपनी संचालकांनी आयुक्तासह स्थानिक नेत्यांच्या घराचे उंबरठे झिजवित आहेत.कोणार्कच्या मागणीनुसार पालिकेने जुन्या जकात कार्यालयाची जागा कंपनी कार्यालयाला मोफत दिली. मात्र, जकात कार्यालया समोरील कोंडवाडा पाडून त्या जागी संरक्षण भिंत उभारल्याचा प्रकार कंपनीने केल्याने एमआरटीपीअंतर्गत कारवाईची मागणी झाली होती. अखेर, राजकीय हस्तक्षेपानंतर कोंडवाडा बांधून देण्याचे आश्वासन दिल्यावर अद्यापही ते बांधले नाही. तसेच कार्यालयासमोर गाड्या पार्किंग होत असल्याने वाहतूककोंडी होऊन परिसरात दुर्गंधी पसरल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. कचरा उचलण्याच्या गाड्या पार्किंगसाठीची व्यवस्था कंपनीने करायची असल्याचे अटी व शर्तीत असताना पालिका मैदानात पार्किंग केल्यास यापुढे कंपनीला दरमहा भाडे आकारले जाणार असल्याचे उपायुक्त नितीन कापडनीस यांनी दिली. (प्रतिनिधी)