शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

‘गावदेवी’वर खेळाडूंनाच प्राधान्य, पार्किंगचे काम झाल्यावर मैदान पूर्ववत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 07:04 IST

Thane : विशेष म्हणजे या भूमिगत पार्किंगबरोबरच शहरासाठी तयार करण्यात आलेेले पार्किंग धोरणदेखील राबवण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाणे : गावदेवी मैदानाचा वापर हा खेळण्यासाठीच होणार असून याठिकाणी भूमिगत पार्किंगचे काम झाल्यानंतर मैदान पूर्ववत करण्याची ग्वाही उच्च न्यायालयात ठाणे महापालिकेने दिली आहे. त्यामुळे जोपर्यंत या याचिकेमध्ये आपल्याकडून नवा मुद्दा उपस्थित केला जाणार नाही, तोपर्यंत सुनावणी होणार नसल्याची माहिती याचिकाकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या भूमिगत पार्किंगबरोबरच शहरासाठी तयार करण्यात आलेेले पार्किंग धोरणदेखील राबवण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.ठाणे स्टेशनजवळील वाहतूककोंडी सोडवण्याकरिता ठाणे महानगरपालिका भगीरथ प्रयत्न करत आहे. याचाच भाग म्हणून गावदेवी मैदानावर उभारण्यात येणारी भव्य भूमिगत पार्किंग तब्बल २७ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभा राहणार आहे. ७०० चौरस मीटरवर हे बांधकाम होणार असून यामध्ये १३० चारचाकी आणि १२० दुचाकी पार्क करता येणार आहेत. मात्र, मैदानाला धक्का न लावता पार्किंगचे काम करण्यात यावे, यासाठी डॉ. महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सुनावणीदरम्यान महापालिकेने पार्किंगचे काम झाल्यावर मैदान पूर्ववत करणार असल्याची माहिती उच्च न्यायालयास दिली आहे. 

पार्किंग धोरणही प्राधान्याने राबवण्याची सूचना - भूमिगत पार्किंगबरोबरच संपूर्ण शहरासाठी तयार करण्यात आलेले पार्किंग धोरणही राबवा, अशी सूचना न्यायालयाने ठाणे महापालिकेला केली आहे. यावर पालिका आयुक्तांशी चर्चा करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.- २००८ साली ठाणे महापालिकेने वाहतूक सर्वेक्षण केले होते. त्याआधारे २०१४ साली पार्किंग धोरण बनवण्यात आले. राष्ट्रीय नागरी वाहतूक पॉलिसीच्या आधारावर हे धोरण बनवण्यात आले आहे, ज्यामध्ये रस्ते वाहनमुक्त आणि पार्किंगचे दर अधिक आकारणे, हा मुख्य उद्देश आहे.- ज्यामुळे नागरिक अधिकाधिक सार्वजनिक वाहनांचा उपयोग करतील. हे धोरण २०१५ साली राबवणे सुरू होणार होते. पालिकेने २७ ठिकाणी अशा पद्धतीने पार्किंग सुरू करण्याची तयारी दाखवली. मात्र, यातील तीनच ठिकाणांवर प्रत्यक्ष काम होऊ शकले.

वाहनांसाठी फक्त चार टक्के जागा वापरणार भूमिगत पार्किंगचे काम झाले, तरी मैदानाचा वापर हा खेळांसाठीच होणार असून, त्यासाठी मैदान पूर्ववत करून देण्याचा दावा प्रशासनाने केला आहे. केवळ भूमिगत पार्किंगमध्ये वाहने आत आणि बाहेर जाण्यासाठी चार टक्के जागेचा वापर होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. याशिवाय, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचा दावादेखील प्रशासनाने केला आहे.

टॅग्स :thaneठाणे