शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

ठामपा मुख्यालयात प्लास्टर पडले

By admin | Updated: April 26, 2017 23:56 IST

एकीकडे ठाणे महापालिकेने मुख्यालयाच्या दुरुस्तीसाठी निविदा काढली असतानाच बुधवारी सकाळी त्याच्या पहिल्या मजल्यावरील जाहिरात

ठाणे : एकीकडे ठाणे महापालिकेने मुख्यालयाच्या दुरुस्तीसाठी निविदा काढली असतानाच बुधवारी सकाळी त्याच्या पहिल्या मजल्यावरील जाहिरात विभागाबाहेरील बाजूच्या भिंतीचे प्लास्टर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली, तरीदेखील मुख्यालय इमारत आता धोकादायक ठरू लागल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक प्रकारची दुरुस्ती तसेच वाढीव बांधकामे होऊ लागल्यानेच तिचे आयुर्मान कमी होऊ लागल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिका मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील प्लास्टर कोसळून एक महिला किरकोळ जखमी झाली होती. त्यानंतर, त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीच त्याचे स्ट्रक्चरल आॅडिट केले असून येत्या १५ ते २० दिवसांमध्ये दुरु स्तीला सुरुवात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. यासाठीची निविदा प्रक्रियादेखील पूर्ण झाली असून त्याकरिता ६ कोटींची तरतूद केल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये मुख्यालय आणि गडकरी रंगायतन धोकादायक नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दुरुस्तीचा निर्णय पालिकेने घेतला होता. महापालिका मुख्यालय इमारतीचे बांधकाम १९८९ मध्ये झाले असून त्या बांधकामास आता २७ वर्षे झाली आहेत. स्ट्रक्चरल आॅडिटनुसार या इमारतीचे बांधकाम सुस्थितीत असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी इमारतीतील काही दुरु स्तीची कामे वारंवार होत असून काही नव्या केबिनही बनवल्या जात आहेत. त्यामुळेच इमारतीचे आयुर्मान आता कमी होऊ लागल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)