शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कोविड रुग्णांसाठी ठाण्याच्या शिवाजी महाराज रुग्णालयात प्लाझ्मादान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 23:49 IST

महापौरांची माहिती : कोरोनामुक्त दात्यांना केले आवाहन

ठाणे : कोविड-१९ रुग्णांवर प्लाझ्मा उपचारपद्धती वरदान ठरत असून महापौर नरेश म्हस्के यांच्या सूचनेनंतर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागात कोविड रुग्णांसाठी प्लाझ्मादान केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. कोरोनामुक्त दात्यांनी जास्तीतजास्त संख्येने प्लाझ्मादान करण्याचे आवाहन महापौर आणि आयुक्तांनी केले आहे.

कोरोनामुक्त रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मामध्ये प्रतिकारशक्ती (ॲण्टीबॉडी) असल्याने ते रुग्णास दिल्यास त्याच्या शरीरात प्रतिकारशक्ती तयार होऊन तो बरा होण्यास मदत होत असल्याने हे प्लाझ्मादान केंद्र सुरू केले आहे. या कामासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसाहाय्य मिळाले असून या सुविधेसाठी केंद्रीय आणि राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी मिळालेली आहे. कोविडपासून बरे झालेल्या व्यक्तींची उपचारानंतर आरटी-पीसीआरची चाचणी निगेटिव्ह आल्यापासून २८ दिवसांनंतर व चार महिन्यांपर्यंत त्या व्यक्ती प्लाझ्मादान करू शकतात. कोरोनातून बरे झालेल्या प्लाझ्मादात्यांची चाचणी करण्यात येते. प्लाझ्मामध्ये प्रतिकारशक्ती योग्य प्रमाणात असल्यास रुग्ण बरा होण्यास मदत होते. यामुळे प्लाझ्मादान करण्यासाठी जास्तीतजास्त कोरोनामुक्त दात्यांनी पुढे यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

सरकारी रुग्णालयात रुग्णांसाठी मोफत सेवा ठाणे परिसरातील सरकारी रुग्णालयातील कोविड रुग्णांसाठी ही सेवा नि:शुल्क पुरवण्यात येत आहे. मात्र, खाजगी रुग्णालयातील रुग्णांसाठी ती सेवा शासकीय नियमानुसार शुल्क आकारून उपलब्ध करून देण्यात आली आहे. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भीमराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व रक्तपेढी विभागप्रमुख डॉ. शिवकुमार कोरी यांच्या सहकार्याने रक्तपेढी विभागामार्फत प्लाझ्मादान केंद्रातील ही सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या