शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात महायुतीच्या उमेदवाराचा पत्ता नसताना प्रचार दौऱ्याचे नियोजन

By अजित मांडके | Updated: April 2, 2024 19:44 IST

महायुतीची बैठकीत मेळाव्याचे नियोजन, कोअर कमिटीचीही स्थापना.

ठाणे :  ठाणे लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीवरुन मतभेदांचे दर्शन घडत आहे. शिवसेना, भाजपकडून दावे प्रतिदावे केले जात असतांना बुधवार पासून महायुतीच्या माध्यमातून मेळावा घेण्याची घोषणा मंगळवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीत करण्यात आली. त्यानुसार महायुतीचा पहिला मेळावा ठाण्यात होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच या बैठकीच्या निमित्ताने महायुतीची एक कमिटीही गठीत करण्यात आली असून त्याच्या माध्यमातून पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

ठाणे लोकसभेसाठी उध्दव सेनेकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर शिंदे सेनेकडून अद्यापही उमेदवारी बाबत कमालाची गुप्तता पाळली जात आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने, ही जागा शिवसेनेचा लढविणार असल्याचा दावा शिंदे सेनेकडून केला जात आहे. तर भाजपने देखील या मतदार संघावर दावा केला आहे. त्यातूनच मुख्यमंत्री शिंदे यांची अडचण मात्र वाढली आहे, त्यातून अद्यापही मार्ग निघू शकलेला नाही. आता पुढील दोन ते तीन दिवसात उमेदवार जाहीर केला जाईल असा दावा देखील दोनही पक्षाकडून केला जात आहे. एकूणच शिवसेना आणि भाजपकडून या जागेसाठी काथ्याकुट सुरु असतांनाच मंगळवारी महायुतीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महायुतीचे महत्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत लोकसभेअंतर्गत घेण्यात येणाºया मेळाव्यांची घोषणा देखील करण्यात आली आहे. त्यानुसार पहिला मेळावा हा ठाण्यात बुधवारी होणार आहे. बुधवारी सांयकाळी ६ वाजता हा मेळावा पार पडणार आहे. त्यानंतर ४ एप्रिल रोजी मिरा भार्इंदर आणि १० एप्रिल रोजी नवी मुंबईला महायुतीचा मेळावा घेतला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच या मेळाव्याच्या निमित्ताने लावण्यात येणाºया बॅनरवर प्रोटोकॉल कसा पाळला जावा, कोणते नेते भाषण करतील याचा पक्षनिहाय क्रमही ठरविण्यात आला. परंतु इथे उमेदवार अंतिम होत नसतांना बाकीचा क्रम मात्र महायुतीकडून लावला जात असल्याने हा आता चर्चेचा विषय झाला आहे.

कमिटीही तयारलोकसभा निवडणुकीचे मेळावे, बैठका व इतर रुपरेषा ठरविण्यासाठी आणि महायुतीमध्ये एकमत रहावे या उद्देशाने एक कोअर कमिटी देखील तयार करण्यात आली आहे. यात शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के, भाजपचे आमदार निरंजन डावखरे आणि राष्टÑवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा समावेश असून त्यांच्यासोबत ठाणे लोकसभा मतदार संघात येणाºया सहा विधानसभेतील महायुतीचे आमदार देखील त्यात असणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.  

ठाण्यातील शहनाई हॉल येथे ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला शिवसेनेकडून शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, भाजपकडून आमदार संजय केळकर, गीता जैन, माजी खासदार संजीव नाईक, संदीप नाईक,  शहर अध्यक्ष संजय वाघुले आणि राष्टÑवादीकडून प्रवक्ते आनंद परांजपे, नजीब मुल्ला, प्रभाकर सावंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन करण्यासाठी नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे आणि संजय वाघुले यांनी पुढाकार घेतला होता.

टॅग्स :thaneठाणे