शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

३०० कोटी खर्चूनही योजना कोरडीच

By admin | Updated: November 14, 2016 04:21 IST

उल्हासनगरमधील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी २००९ मध्ये पाणीपुरवठा योजना राबविली. १२७ कोटी ६५ लाखांची योजना ३०० कोटीवर

उल्हासनगरमधील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी २००९ मध्ये पाणीपुरवठा योजना राबविली. १२७ कोटी ६५ लाखांची योजना ३०० कोटीवर गेल्यावर अर्धवट व ठप्प पडली. लोकसंख्येच्या प्रमाणात दुप्पट पाणीपुरवठा होऊनही नागरिकांना आज दिवसाआड तर काही ठिकाणी आठवड्यात केवळ दोन दिवस पाणी मिळते. मग अतिरीक्त पाणी नेमके मुरतेय कुठे? याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. योजनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याने खळबळ उडाली. तर तज्ज्ञांच्या मते योजना ५०० कोटीवर गेल्यावर पूर्ण होणार आहे.उल्हासनगरची पाणी वितरण व्यवस्था ६५ वर्षापूर्वीची जुनी आहे. त्यामुळे जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्यामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. जुन्या जलवाहिन्यांवर इमारती उभ्या राहिल्याने त्यांचा शोध घेणे पालिका कर्मचाऱ्यांना कठीण झाले आहे. शहराचा भूभाग उंच-सखल असल्याने अनियमीत पाणीपुरवठा होतो. अशी विविध कारणे देत शहरातील पाणी वितरण व्यवस्था पूर्ण बदलण्यासाठी जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान अभियान योजनेअंतर्गत १२७.६५ कोटीच्या योजनेला मंजुरी मिळाली. मात्र ही योजना राजकीय नेत्यांसह नगरसेवक, पालिका अधिकारी, तथाकथित सामाजिक कार्यकर्ते, कंत्राटदारांना चरण्यासाठी एका प्रकारे कुरण मिळाल्याचे उघड झाले. त्यामुळेच मागील आठ वर्षात योजनेवर ३०० कोटी खर्च होऊनही अर्धवट व ठप्प पडली आहे. पाणीवितरण योजनेतंर्गत संपूर्ण शहरात नवीन जलवाहिनी टाकणे, प्रत्येक घराला नळजोडणी देत मीटर बसविणे, जलवाहिनीसाठी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, पाणीपुरवठा नियमित व मुबलक होण्यासाठी ११ उंच जलकुंभासह एक भूमिगत जलकुंभ उभारणे, पाण्याचा दाब कायम ठेवण्यासाठी दोन पंम्पिग स्टेशन उभारणे आदी कामे योजनेतंर्गत होती. मात्र शहर विकास आराखडयानुसार सुरुवातीला मुख्य रस्ते व बॅरेक, ब्लॉक परिसरात जलवाहिनी टाकण्यात आल्या. झोपडपट्टीचा समावेश योजनेत नसल्याने वाढीव योजनेला वेळोवेळी मंजुरी देऊन योजना ३०० कोटीवर गेली. योजना पूर्ण होण्यासाठी अजून २०० कोटीची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे मत आहे.