शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे, धुळधाणीमुळे वाहनचालक बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 00:59 IST

खडीकरणाचा उतारा ठरतोय निरुपयोगी

डोंबिवली : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांपाठोपाठ आता त्यातील उडणाऱ्या धुळीमुळे सध्या नागरिक चांगलेच बेजार झाले आहेत. पावसाने उघडीप दिल्याने केडीएमसीने डांबराचे पॅच मारण्यास सुरुवात केली असली, तरी काही महत्त्वाचे रस्ते अजूनही खड्ड्यांतच आहेत. दरम्यान, या खड्ड्यांतील खडी इतरत्र पसरल्याने त्रासात अधिकच भर पडत आहे.शहरातील मुख्य रस्ते व चौकांची खड्ड्यांमुळे दयनीय स्थिती झाली आहे. सध्या डांबरीकरणाची कामे सुरू झाली असली, तरी त्याला वेग आलेला नाही. त्यामुळे बहुतांश रस्ते आजही खड्ड्यांतच आहेत. मनसेने खड्ड्यांच्या मुद्यावर १ आॅक्टोबरला केडीएमसीच्या वर्धापनदिनी अभिनव आंदोलन केले होते. ज्या टिळक रोडवर आंदोलन झाले, तेथेही आज डांबर पडलेले नाही. दुसरीकडे ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्याचीही खड्ड्यांनी पुरती चाळण केली आहे.या रस्त्याच्या एका मार्गिकेवर अमृत योजनेंतर्गत मलवाहिनी टाकण्यात येत आहे. मात्र, जीवन प्राधिकरणाकडून ही कामे संथगतीने सुरू असल्याने अनेक महिने ही मार्गिका वाहनांसाठी बंदच आहे.एमआयडीसीच्या निवासी भागातही खड्डे कायम असून, तेथील मुख्य रस्ते खड्ड्यांत गेल्याने धुळीच्या त्रासाने रहिवासी पुरते हैराण झाले आहेत. खड्ड्यांमध्ये टाकलेली खडी इतरत्र पसरल्याने त्यावरून वाहने नेताना वाहनचालकांची विशेषकरून दुचाकीचालकांची तारेवरची कसरत सुरू असल्याचे दिसून येते. दरम्यान, खड्डे व धुळीतून मुक्तता होणार कधी, असा सवाल केला जात आहे....तर विभागीय कार्यालयावर मोर्चा काढू - काकडेडोंबिवलीतील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा २० आॅक्टोबरला केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन रिक्षाचालक-मालक युनियनने दिला आहे.पूर्व-पश्चिमेतील रस्त्यांची दुर्दशा झाली असून, वाहने खड्ड्यांत आदळत आहेत. रिक्षाचालकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत असल्याकडे युनियनचे अध्यक्ष रामा काकडे यांनी लक्ष वेधले आहे. रस्ते दुरुस्तीसंदर्भात त्यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे.