शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Ambernath: अंबरनाथच्या शिवसेना शाखेतून उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो काढले

By पंकज पाटील | Updated: March 14, 2023 18:16 IST

Ambernath: अंबरनाथमधील शिवसेनेचे ठाकरे गट शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरू असतानाच अचानक आज शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढण्यात आले आहेत.

- पंकज पाटील अंबरनाथ: अंबरनाथमधील शिवसेनेचे ठाकरे गट शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरू असतानाच अचानक आज शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढण्यात आले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो तसाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शाखेसह ठाकरे गटातील सर्व पदाधिकारी शिंदे गटात जाणारे निश्चित मानले जात आहे.

अंबरनाथ मधील शिवसेनेच्या ठाकरे गटातील सर्व पदाधिकाऱ्यांना शाखेसह शिंदे गटात घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत ठाकरे गडाच्या शहरप्रमुखांसोबत देखील स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी चर्चा केली आहे. शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटातील सर्व पदाधिकारी शिंदे गटात येणार हे निश्चित मानले जात असतानाच आता शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत ठाकरे यांचे सर्व फोटो काढण्यात आले आहेत. शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेमध्ये यापूर्वी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले होते.

शिवसेना दोन गटात विभागल्यानंतरही या शाखेतील ठाकरेंचे आणि एकनाथ शिंदेचे फोटो तसेच ठेवण्यात आले होते. मात्र गेल्या दोन दिवसात ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात घेण्यासाठी सर्व ताकद पणाला लावण्यात आली असून आता संपूर्ण शिवसेना ही शिंदे गटात येणार हे निश्चित मानले जात आहे. त्यातच सोमवारी शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत असलेले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढण्यात आले आहे. तर एकनाथ शिंदे यांचा फोटो तसाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचे मध्यवर्ती शाखा ही शिंदे गटाच्या ताब्यात जाणारा आणि त्यासोबतच ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील शिवसेनेत जाणार हे निश्चित झाले आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथShiv Senaशिवसेना