शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विकास परियोजनेचा दुसरा टप्पा : टिटवाळ्यात टाउनशिप?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 02:14 IST

विकास परियोजनेचा दुसरा टप्पा : उंबर्डे येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या बफर झोनमुळे जागा बदलण्याची शक्यता

मुरलीधर भवार 

कल्याण : पश्चिमेतील सापाड आणि वाडेघर येथे पहिल्या टप्प्यात २९४ हेक्टर जागेवर विकास परियोजना (टाउनशिप स्कीम) राबवली जाणार आहे. हा टप्पा मार्गी लागल्यानंतर उंबर्डे येथे या परियोजनेद्वारे सुनियोजित विकासाचा दुसरा टप्पा प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, या परिसरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पाच्या बफरझोनमुळे या प्रस्तावित जागेच्या विकासात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील टाउनशिप ही उंबर्डेऐवजी टिटवाळा-मांडा, मांडा परिसरात प्रस्तावित केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापालिकेने दुसºया टप्प्यातील विकास परियोजना उंबर्डे येथून टिटवाळा, मांडा आणि मोहने परिसरात हलवण्याचे ठरवले आहे. मात्र, त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. विकास परियोजनेसाठी हरित क्षेत्र, मोकळी जागा आवश्यक असते. उंबर्डे येथील हरित क्षेत्र कचरा प्रकल्पामुळे बाधित झालेले आहे. त्यामुळे हरित क्षेत्र असलेले टिटवाळा, मांडा आणि मोहने परिसर पर्याय म्हणून पुढे आला आहे. उंबर्डे येथे महापालिकेने घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, कचºयापासून बायोगॅसनिर्मिती प्रकल्प, जैविक कचरा प्रकल्प उभारले आहेत. तर, याच परिसरात १० एकर जागेत कचºयापासून वीजनिर्मिती प्रकल्पही प्रस्तावित आहे. या प्रकल्पांसाठी बफरझोनची जागा जास्त सोडावी लागणार आहे. त्यामुळे उंबर्डे येथील हरित क्षेत्र बाधित होत असल्यामुळे विकास परियोजनेसाठी आवश्यक जागा मिळण्यात अडचण येण्याची शक्यता आहे.मांडा येथेही महापालिकेचा कचरा भरावभूमी प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र, या प्रकल्पाला नागरिकांचा तीव्र विरोध असून अद्याप पर्यावरण खात्याचा ‘ना-हरकत’ दाखलाही मिळालेला नाही. मांडा येथे कचराभरावभूमी प्रकल्प झाला तरी बफरझोन सोडून पुरेसे हरित क्षेत्र मिळू शकते, असे पालिकेचे म्हणणे आहे. मोहने परिसरात एनआरसी कंपनी बंद पडली असून या कंपनीच्या कामगारांच्या थकबाकीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हा प्रश्न निकाली निघाल्यावर तेथे खाजगी विकासकाकडून गृहसंकुलाचा बडा प्रकल्प राबवला जाण्याची शक्यता आहे. टिटवाळा-मांडा परिसरातील बेकायदा बांधकामांचा यात मोठा अडथळा आहे. त्यावर अतिक्रमणविरोधी विभागाकडून कारवाई होत नसल्याने महापालिकेचा सुनियोजित विकासाचा दावा अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सापाड व वाडेघर येथील विकास परियोजनेच्या प्रस्तावित जागेवर बेकायदा चाळी उभारल्या जात असल्याकडे उंबर्डे येथील शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक जयवंत भोईर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. बेकायदा बांधकामांमुळे सुनियोजित विकास योजनेत अडथळ्यांकडे लक्ष वेधत त्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी भोईर यांनी केली आहे.डोंबिवलीतही विकास परियोजना प्रस्तावितडोंबिवली पश्चिमेतील मोठागाव ठाकुर्ली परिसर, महापालिकेतील २७ गावे याठिकाणीही विकास परियोजना प्रस्तावित करण्यात आली आहे. २७ गावांपैकी १० गावांत कल्याण ग्रोथ सेंटर प्रस्तावित आहे. पाच वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या या ग्रोथ सेंटरची एक वीटही पाच वर्षांत रचली गेलेली नाही.एक हजार ८९ हेक्टर जागेवर प्रस्तावित या प्रकल्पाला एक हजार ८९ कोटी मंजूर झाले आहेत. टाउन प्लानिंग स्कीम असलेले ग्रोथ सेंटर हे विकास परियोजनेच्या धर्तीवर विकसित केले जाणार आहे. ग्रोथ सेंटरमधील १० गावे वगळता १७ गावांपैकी काही गावांमध्ये विकास परियोजना प्रस्तावित आहे.दरम्यान, ग्रोथ सेंटरची संकल्पना ही भाजप सरकारची होती. सध्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीकडून ती गुंडाळली जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

टॅग्स :thaneठाणे