शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दूध पोहचवण्यासाठी गेलेल्याचा लिफ्टच्या डकमध्ये पडुन मृत्यू 

By कुमार बडदे | Updated: July 18, 2023 23:33 IST

अधिक तपास सुरु आहे. 

कुमार बडदे, लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंब्राः  दूध पोहचवण्यासाठी गेलेल्या ४५ वर्षाच्या  व्यक्तीचा इमारतीच्या लिफ्टच्या डक मध्ये पडून  मृत्यु झाल्याची घटना मुंब्रा शहरातील कौसा भागातील  अलमास कॉलनी परीसरात मंगळवारी  घडली. जटाशंकर  पाल असे मृताचे नाव आहे. सकाळी डकमध्ये पडलेल्या पाल याचा  मृतदेह रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास स्थानिक रहिवाशांना  आढळुन आला. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असुन अधिक तपास सुरु आहे. 

मुंब्रा, कौसा येथील चांदनगर नगर मधील जरीना अपार्टमेंन्ट या इमारतीच्या बी विंग मध्ये असलेल्या   दूध डेरी मधील  पाल हा  अलमास  कॉलनीतील अनमोल अपार्टमेंटमध्ये या इमारती  मध्ये सकाळी दुध पोहचवण्यासाठी  गेला होता. तेव्हा इमारतीच्या लिफ्टच्या डकमध्ये तो पडला होता. त्याचा मृतदेह रात्री साडेआठ वाजता  आढळून आला.पोलिसांनी कायदेशीर कार्यवाही करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला.  याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून,पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

टॅग्स :thaneठाणेmumbraमुंब्रा