शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
7
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
8
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
9
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
10
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
11
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
12
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

डोंबिवलीतील विभा कंपनीच्या जागेत कोविड रुग्णालय सुरू करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:38 AM

कल्याण : डोंबिवलीतील विभा कंपनीच्या प्रशस्त जागेत कोविड रुग्णालय सुरू करण्याची परवानगी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाकडे मागितली ...

कल्याण : डोंबिवलीतील विभा कंपनीच्या प्रशस्त जागेत कोविड रुग्णालय सुरू करण्याची परवानगी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयाने ती दिल्यामुळे रुग्णालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या जागेत ५८० बेडचे रुग्णालय सुरू करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे.

महापालिका हद्दीत महापालिकेच्या सात आणि ९० खासगी कोविड रुग्णालये आहेत. कोरोनाची दुसरी लाट सध्या सुरू आहे. भविष्यात तिसऱ्या लाटेचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. रुग्णांसाठी डोंबिवली क्रीडासंकुलातील बंदिस्त सभागृहात व टेनिस कोर्टावर कोविड रुग्णालय सुरू आहे. त्याचबरोबर क्रीडासंकुलात महापालिकेची बीओटी तत्त्वावर कोणार्क कंपनीला विकसित करण्यासाठी दिलेली मालमत्ता आहे. या ठिकाणी २६५ बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. मात्र त्या ठिकाणी पाणी आणि विजेची सुविधा तयार करावी लागणार असल्याने महापालिकेने दुसरी जागा शोधली. क्रीडासंकुलापासून २०० मीटरच्या अंतरावर विभा कंपनी आहे. या कंपनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या कंपनीच्या तयार इमारतीत कोविड रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे मांडला गेला होता. मात्र कंपनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने महापालिकेने न्यायालयाकडे परवानगी मागितली. कोरोना परिस्थिती पाहता न्यायालयाने महापालिकेस विभा कंपनीच्या इमारतीत कोविड रुग्णालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी सत्य प्रतिज्ञापत्र सादर करा असे सांगितले होते. महापालिकेने सत्य प्रतिज्ञापत्र सादर केले असून, आता पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.

....................

महापालिकेच्या शहर अभियंत्या सपना कोळी-देवनपल्ली यांनी सांगितले की, विभा कंपनीच्या जागेत प्रशस्त कोविड रुग्णालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याच्या कामासाठी एक कोटी ५० लाखांची निविदा काढण्यात आलेली आहे. या रुग्णालयात ३६० ऑक्सिजन आणि २२० आयसीयू बेड उपलब्ध होणार आहेत. रुग्णालय येत्या महिनाभरात सुरू होईल.

...................

विभा कंपनीच्या आवारात कोविड रुग्णालय सुरू करण्यास न्यायालयाची परवानगी मिळाल्याने महापालिकेने क्रीडासंकुलातील कोणार्क कंपनीच्या वास्तूत २६५ बेडचे रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव तूर्तास स्थगित केला आहे. त्या ठिकाणी केवळ २६५ बेड उपलब्ध होणार होते. विभा कंपनीच्या जागेतील रुग्णालयात ५८० बेड उपलब्ध होणार आहेत.

--------------------