शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

परवानगीआधीच मंडप उभारणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 03:13 IST

गणेशोत्सव असेल अथवा नवरात्रोत्सव, यासाठी ठाणे महापालिकेने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे

ठाणे : गणेशोत्सव असेल अथवा नवरात्रोत्सव, यासाठी ठाणे महापालिकेने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. तीनुसार मंडपाची परवानगी ३० दिवस आधी घ्यावी, असा नियम असला तरीदेखील त्याआधीच शहरात गणेशोत्सव मंडपउभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे पालिकेकडे सादर झालेल्या अर्जांवर अद्यापही मंजुरी मिळाली नसल्याने आणि गणेशोत्सवाला काही दिवसच शिल्लक असल्याने काही बड्या गणेशोत्सव मंडळांनी आधीच मंडपउभारणीला सुरुवात केली आहे.गणेशोत्सवांच्या मंडपासाठी एक तृतीयांशपेक्षा जास्त रस्ता अडवू नये, पूर्वपरवानगी ३० दिवस आधी घ्यावी, वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने मंडप उभारावा, वाहतूक पोलीस, अग्निशमन दल, स्थानिक पोलीस स्टेशन यांची एनओसी बंधनकारक, मंडपांसाठी रस्ते खोदल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, टीएमटी बसमार्गावर १२ फूट रस्ता मोकळा ठेवावा, अशा अनेक अटींची आदर्श आचारसंहिता ठाणे पालिकेने उत्सवांसाठी तयार केली असली, तरी ती यंदाही कागदावरच राहणार आहे. पारंपरिक उत्सवांच्या मार्गात कोणतेही विघ्न निर्माण करू नये, असे अप्रत्यक्ष आदेशच राज्य सरकारकडून जारी झाल्यामुळे पालिकेला आपल्या संभाव्य कारवाईची हत्यारे उपसण्याआधीच म्यान करावी लागणार आहेत. परंतु, यावर काही तोडगा काढता येऊ शकतो, याची चाचपणी आता पालिकेने सुरू केली आहे.पारंपरिक गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक बोलवली होती. त्या बैठकीला मंत्रिमंडळातील मंत्र्यांसह वरिष्ठ आयएएस, आयपीएस अधिकारी उपस्थित होते.ठाणे पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचाही त्यात समावेश होता. या बैठकीतील चर्चा प्रामुख्याने मुंबईतील उत्सव, त्यांना भेडसावणाºया समस्या आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत होती. मात्र, बैठकीदरम्यान परंपरागत उत्सवांमध्ये विघ्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, नव्याने ज्या उत्सवांना परवानगी दिली जाईल, ती नियमांच्या काटेकोर चौकटीतच द्यावी, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, मागील वर्षीदेखील पालिकेच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाºया मंडळांना पालिकेने नोटिसा बजावून एक लाख रुपये भरण्याचे फर्मान काढले होते.परंतु, याला राजकीय विरोध झाल्याने पालिकेला आपली तलवार म्यान करावी लागली होती. आता कुठला निर्णय घेते याकडे लक्ष आहे.>गणेश मंडळांना आधीच जाणीवआतादेखील राज्य सरकारकडूनच अप्रत्यक्षरीत्या उत्सव साजरे करण्याबाबत कोणतेही विघ्न न आणण्याचे सांगण्यात आल्याने पालिकेला आपली आदर्श आचारसंहिता अडगळीत टाकावी लागणार आहे.कदाचित गणेशोत्सव मंडळांनादेखील याची जाणीव आधीच झाली असणार म्हणूनच त्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मंडपउभारणीचे काम सुरू केल्याचे काही ठिकाणी दिसत आहे.मंडप उभारणीसाठी ३० दिवस आधी परवानगी घ्यावी, अशी पालिकेच्या आदर्श आचारसंहितेत अट आहे. परंतु, आता गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पालिकेने अद्यापही अर्जांवर निर्णय न घेतल्याने काही मंडळांनी आधीच मंडप उभारणीला सुरुवात केली आहे.