शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

स्थायीच्या चाव्या अखेर भाजपाकडेच

By admin | Updated: April 5, 2016 01:23 IST

मुंबईत एकीकडे प्रभाग समितीच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपा युतीत तडा गेला असताना ठाण्यात मात्र शिवसेनेने भाजपाला दिलेला शब्द पाळला आहे

ठाणे : मुंबईत एकीकडे प्रभाग समितीच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपा युतीत तडा गेला असताना ठाण्यात मात्र शिवसेनेने भाजपाला दिलेला शब्द पाळला आहे. स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे संजय वाघुले यांनी राष्ट्रवादीच्या प्रमिला केणी यांचा ९ विरुद्ध पाच असा पराभव केला. परंतु, काँग्रेसने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली.ठाणे महापालिकेच्या सत्ता स्थापनेच्या राजकारणात पाच वर्षांत एकदा स्थायी समितीचे सभापतीपद भाजपाला देण्याचे ठरले होते. त्यानुसार, मागील वर्षीच शब्द शिवसेनेने भाजपाला दिला होता. परंतु, ऐनवेळेस कुरघोडी करून स्थायीच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या. त्यानंतर, आता शेवटचे वर्ष हे भाजपाला देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार, शिवसेनेने दिलेला शब्द पाळून भाजपाला स्थायीची संधी दिली. स्थायी समितीच्या सभापतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून संजय वाघुले आणि राष्ट्रवादीकडून प्रमिला केणी या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास कै. अरविंद पेंडसे सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सुरुवातीला राष्ट्रवादीचा उमेदवार माघार घेईल, अशी चर्चा सुरू होती. परंतु, केणी यांनी माघार न घेता निवडणूक लढवली. या वेळी झालेल्या मतदानात भाजपाच्या बाजूने ९ आणि राष्ट्रवादीच्या बाजूने ५ मते पडली. त्यानुसार, वाघुले यांचा विजय झाला. अखेरच्या टप्प्यात आता भाजपाच्या हाती स्थायीच्या चाव्या आल्या आहेत. दरम्यान, मुंबईत प्रभाग समितीच्या निवडणुकीच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजपा युतीत दरी निर्माण झाली आहे. त्याच धर्तीवर ठाण्यात शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु, शिवसेनेने भाजपाला दिलेला शब्द पाळल्याने स्थायीच्या चाव्या त्यांच्या वाट्याला आल्या. या वेळी काँग्रेसची दोन मते राष्ट्रवादीला मिळतील, अशी शक्यता वाटत होती. परंतु, काँग्रेसने तटस्थ राहून राष्ट्रवादीला एक प्रकारे जोरदार चपराक लगावली आहे.