शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी निवडणूक; सेनचे बंडखोर म्हात्रे घेणार माघार ?

By admin | Updated: December 15, 2015 01:04 IST

१६ डिसेंबर रोजी पार पडणारी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक शिवसेनेतील बंडखोरीमुळे चर्चेत आली आहे. पक्षाचे बंडखोर उमेदवार प्रभाकर म्हात्रे यांना माघार घेण्यासाठी थेट मातोश्रीवरुन

- राजू काळे,  भार्इंदर१६ डिसेंबर रोजी पार पडणारी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक शिवसेनेतील बंडखोरीमुळे चर्चेत आली आहे. पक्षाचे बंडखोर उमेदवार प्रभाकर म्हात्रे यांना माघार घेण्यासाठी थेट मातोश्रीवरुन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आदेश दिल्याने ते उमेदवारी मागे घेणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.पालिकेत सत्तांतर होऊन शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली आहे. त्यावेळी शिवसेनेकडून महापौरपदावर दावा सुरु झाल्याने त्यावर ज्येष्ठतेनुसार नगरसेवक प्रभाकर म्हात्रे यांची दावेदारी सुरु झाली होती. परंतु, दोन्ही पक्षांच्या तहानुसार हे पद भाजपाच्या वाट्याला तर उपमहापौरपद शिवसेनेच्या वाट्याला आले. म्हात्रे उपमहापौर न झाल्याने त्यांना पुढे प्रभाग समिती क्र. ६ मधील सभापतीपदी निवडून आणले. सध्या त्यांचा स्थायीत समावेश झाल्याने यंदाचे सभापतीपदही आपल्यालाच मिळणार, अशी आशा त्यांना होती. मात्र पक्षाने गतवेळेप्रमाणे यंदाचे दावेदार हरिश्चंद्र आमगावकर यांनाच उमेदवारी दिल्याने ते नाराज झाले. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीसह बहुजन विकास आघाडीचा पाठींबा मिळवून उमेदवारी दाखल केली. ती मागे घेण्यासाठी सेनेतील वरीष्ठांकडून दबावतंत्राचा वापर होत होता.- अखेर मातोश्रीवर साकडे घातल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये त्यांना रविवारी (१३ डिसेंबर) पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी आमंत्रित केले होते. तेथे पालकमंत्र्यांनी बंडखोरीवरील परिणामाच्या कानपिचक्या त्यांना देऊन जी काही नाराजी असेल त्यावर नंतर चर्चा केली जाईल, पहिल्यांदा उमेदवारी मागे घ्या, असे फर्मान सोडले.