शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

स्थायीची १२ विषयांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:41 IST

खड्डे भरण्यास प्राधान्य; उद्या आणखी १५ विषय पटलावर

कल्याण : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू होण्याची शक्यता असल्याने केडीएमसीच्या स्थायी समितीने सभांचा सपाटा लावला आला. दुसऱ्या शनिवारी महापालिकेला सुटी असतानाही आज सभा झाली. यामध्ये ३५ कोटींच्या खर्चाच्या विकासकामांचे विषय मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले होते. आजच्या सभेत खड्डे भरण्याच्या कामांसह विषय पत्रिकेवरील आठ व आयत्यावेळी घेतलेल्या चार विषयांना मंजुरी देऊ न सभा तहकूब करण्यात आली. १५ विषय प्रलंबित असून त्यासाठी सोमवारी सभा होणार आहे.प्रत्यक्ष मतदानापूर्वी ४५ दिवसआधी आचारसंहिता लागू होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक कामासाठी महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश निवडणूक विभागाने काढले आहेत. आचारसंहिता केव्हाही लागू होण्याची शक्यता असल्याने विकासकामांची मंजुरी खोळंबू नये यासाठी दोन आठवड्यांपासून स्थायी समितीच्या सभांचा सपाटा सुरू आहे.नालेसफाई, पावसाळ्यापूर्वी खोदलेले रस्ते, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची कामे यांचा समावेश असून मागील बैठकीत मोठ्या नाल्यांच्या सफाईच्या विषयाला सभेने मंजुरी दिली आहे. त्यावेळी छोट्या नाल्यांच्या सफाईचा मुद्दा आला होता. हे विषय सोमवारच्या सभेत मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत, अशी माहिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम वर्षभर करण्यात येते. पावसाळ््यापूर्वी, पावसाळ्यात, पावसाळ्यानंतर अशा तीन वेळा खड्डे भरले जातात. त्याला आज मंजुरी देण्यात आली. विविध मोबाइल कंपन्यांनी रस्ते खोदून ठेवले असून त्यांच्याकडून १६ कोटींची खड्डे फी महापालिकेने वसूल केली आहे. पुढच्या वर्षी २० कोटींची रक्कम महापालिकेस मिळणार आहे. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कामाला सभेने प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या काही शाळा दुरुस्तीचे विषय महत्त्वाचे आहेत. तेही सोमवारच्या बैठकीत मार्गी लावले जाणार आहेत.सभा उशिरा सुरूसभा सकाळी १० वाजता होणार होती. मात्र, आयत्यावेळी घेतलेल्या विषयांचा घोषवारा परिपूर्ण नसल्याने सभा दुपारी २ वाजता सुरू झाली. तोपर्यंत सदस्य आणि अधिकारी थांबून होते. आयुक्त आजारी असल्याने ते रजेवर गेले आहेत. काही विषयांवर त्यांच्या सह्या होणे बाकी होते. त्यामुळे सभेला उशीर झाला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९kdmcकल्याण डोंबिवली महापालिका