शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागरी सोयीसुविधा करणार लोकाभिमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:39 IST

कल्याण : केडीएमसीचा १,७०० कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना नागरी सोयीसुविधा लोकाभिमुख करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मनपा आयुक्त डॉ. ...

कल्याण : केडीएमसीचा १,७०० कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना नागरी सोयीसुविधा लोकाभिमुख करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच थिंक टँक स्कीम ही नवी संकल्पना वापरण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी समस्येचा सखोल अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांचे विचार गट तयार केले जातील. त्याला थिंक टँक स्कीम, असे आयुक्तांनी संबोधले आहे. मनपाने स्मार्ट सिटीचे प्रकल्प निश्चित करण्यापूर्वी अशा प्रकारे लोकांकडून काही अभिप्राय मागवले होते. त्यावेळी कोणत्या प्रकल्पांना प्राधान्य द्यावे, नागरिकांना नेमके काय हवे, याची चाचपणी करून स्टेशन परिसराचा विकास हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानंतर सरकारच्या इज ऑफ लिव्हिंग या सर्वेक्षणावेळी शहर तुम्हाला नेमके कसे हवे आणि ते राहण्यायोग्य आहे का, असा कल जाणून घेतला होता. मात्र, शहरातील समस्या सोडवण्यासाठी थिंक टँक स्कीमची मात्रा कितपत लागू पडते, हे पाहावे लागणार आहे. मात्र, आयुक्तांच्या या नव्या संकल्पनेचे स्वागत करण्यात आले आहे.

मनपा हद्दीतील कचरा समस्या सोडवण्यासाठी सध्या शून्य कचरा मोहीम राबवली जात आहे. त्यानंतर आता शहरातील रस्ते आणि उद्याने विकसित केली जाणार आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत स्टेशन परिसराचा विकास सध्या सुरू आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत सीसीटीव्ही आणि सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. सिटी पार्क आणि काळा तलावाचाही विकास करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पातील तरतुदी

- शहरातील नदीकिनारा आणि उल्हास नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मलनि:सारण प्रक्रिया प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यावर भर दिला जाणार आहे.

- पीपीपी तत्त्वावर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. डोंबिवलीतील सूतिकागृहाचे काम सुरू करण्यात येणार आहे.

- शहरात एलईडी दिवे लावून विजेची बचत केली जाणार आहे. नागरी सुविधा केंद्रे स्मार्ट करण्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

- उद्याने विकसित करण्यासाठी दोन कोटी ६० लाख रुपयांची तरतूद केली आहे. उल्हास नदीचा किनारा सुशोभीकरण करणे, दुर्गाडी परिसरात नौदल आर्ट गॅलरी उभारण्यात येणार आहे.

- महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर यंदा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. कर्मचाऱ्यांच्या बायोमेट्रिक प्रणाली व सेवा पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे.

---------------------------------