शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर 22 कोटींची दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:28 IST

दंड न भरल्यास वाहने जप्त होणार : पोलीस उपायुक्तांचा इशारा

n  लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूक नियम तोडणारे चालकांविरुद्ध जानेवारी ते १८ नाेव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये २२ कोटी दोन लाख ७५ हजार १५० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. यातील अनेकांनी हा दंड भरलेला नाही. यापुढे थकीत दंड १० दिवसांमध्ये न भरल्यास संबंधित वाहन जप्त केले जाणार असल्याचा इशारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला.

शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या १८ उपविभागांमार्फतीने १४ फेब्रुवारी २०१९ पासून ई-चलन प्रक्रिया सुरू केली आहे. वाहतूक नियम तोडणारे दररोज सुमारे अडीच हजार वाहनचालकांविरुद्ध ३०० ई-चलन डिव्हाइसमार्फत विशेष मोहिमेंतर्गत कारवाई केली जाते. रस्ते अपघातांमध्ये घट येण्यासाठी तसेच वाहतुकीमध्ये शिस्त येण्यासाठी चालकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. या कायद्याची परिणामकारकता साधण्यासाठी नियम तोडणारे वाहनचालक आणि मालकांकडून ई-चलनाद्वारे केलेल्या कारवाईची तडजोड रक्कम वसूल होणेही आवश्यक आहे. त्यामुळे एका विशेष मोहिमेंतर्गत यापुढे दंड थकविणारे यांच्याविरुद्ध नाकाबंदीद्वारे वाहनांची चलनतपासणी केली जाणार आहे अशी माहिती या वेळी देण्यात आली.

महाराष्ट्रात कुठेही भरता येणार दंडाची रक्कमnएखाद्याने ठाण्यात वाहतुकीचा नियम मोडला असेल, तर संबंधित वाहनचालक हा मुंबईत किंवा महाराष्ट्रात कुठेही वाहतूक शाखेच्या पोलिसांकडे ई-चलनाची रक्कम डेबिट किंवा क्रेडिटकार्डद्वारे भरणा करू शकतो.nमहाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटवर जाऊनही वाहन क्रमांक, चलन क्रमांक नमूद करून आपल्या वाहनावरील प्रलंबित तडजोड शुल्क चलन क्रमांकाची निवड करून भरता येणार आहे.nपेटीएमद्वारेही चलन भरण्याची सुविधा आहे. तसेच महाराष्ट्र ॲप, मुम ट्रॅफिक ॲपमध्ये माय व्हेइकल या टॅबवर क्लिक करून आपल्या वाहनाचे रजिस्ट्रेशन करावे. नंतर, माय ई-चलनवर क्लिक केल्यावर ही रक्कम भरता येणार आहे.

थकबाकीदारांवर बडगा १४ फेब्रुवारी ते डिसेंबर २०१९ दरम्यान सहा लाख ३० हजार २३२ चलनद्वारे २१ कोटी १४ लाखांची दंडात्मक कारवाई झाली. तर, १ जानेवारी ते १८ नोव्हेंबर २०२० या काळात पाच लाख ५२ हजार ४५३ चलनद्वारे २२ कोटी दोन लाख ७५ हजार १५० रुपयांची दंडात्मक कारवाई झाली. यातील थकबाकीदारांवर आता कारवाई केली जाणार आहे.