शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

पापलेटचे दर पाडले : गुजरातच्या बड्या निर्यातदार व्यापा-यांचे संगनमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 02:05 IST

गुजरातमधील बड्या निर्यातदार व्यापाºयांनी संगनमत करून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरंग्याचे (पापलेट) दर पाडल्याने मनोरीपासून सातपाटीपर्यंतच्या हजारो मच्छीमारांना प्रचंड मोठे नुकसान सोसावे लागते आहे

धीरज परब मीरा रोड : गुजरातमधील बड्या निर्यातदार व्यापा-यांनी संगनमत करून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरंग्याचे (पापलेट) दर पाडल्याने मनोरीपासून सातपाटीपर्यंतच्या हजारो मच्छीमारांना प्रचंड मोठे नुकसान सोसावे लागते आहे. सध्या त्यांनी व्यापा-यांना नाईलाजाने पापलेट देण्यास सुरवात केली असली, तरी दराची शाश्वती नसल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत. दर पाडल्याने मच्छीमारांचे टनामागे दोन लाखांचे नुकसान होणार आहे. याबाबत चर्चा करूनही व्यापारी दाद देत नसल्याने राज्य सरकारला मध्यस्थीची विनंती करण्याचा निर्णय मच्छीमारांनी घेतला आहे. त्यातूनही प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा संघटनांनी दिला आहे.महाराष्ट्रातून कोट्यवधी रुपयांची मासळी खरेदी करून त्याची निर्यात करणारे गुजरातचे व्यापारी नफेखोरी करत आहेत. शिवाय परकी चलन गुजरातकडे वळल्याने राज्याचे आर्थिक नुकसान होत आहे.राज्यात १ आॅगस्टपासून मासेमारीचा हंगाम सुरु झाला. मुंबई ते पालघर पट्ट्यात मच्छीमारांच्या १७०० बोटी असून अनेक सहकारी संस्था आहेत. मासेमारीत सर्वात जास्त उत्पन्न पापलेटमधून मिळते. दरवर्षी सातपाटी येथील मच्छीमारांचे फेडरेशन मच्छीमारांना चांगला दर मिळावा, म्हणून प्रयत्न करत असते. गुजरातमधील निर्यातदार व्यापाºयांशी चर्चा करुन पापलेटच्या वर्गवारीनुसार दर ठरवला जातो. यंदा मात्र गुजरातमधील निर्यातदार व्यापाºयांनी पाकिस्तान आणि दुबईत मोठ्या प्रमाणात पापलेटचे उत्पादन वाढल्याने तसेच डॉलरचे दर घसरल्याचे कारण पुढे करुन गेल्यावर्षीच्या तुलनेत पापलेटचे दर पाडले आहेत.एका किलोमागे तब्बल २०० रुपयांनी कमी भाव मिळणार असल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत. मासेमारीचा हंगाम सुरू झाला आणि पापलेटचा साठा करण्याची सोयही उपलब्ध नसल्याने नाईलाजाने दराची हमी नसताना व्यापाºयांना मासळी देण्याशिवाय मच्छीमारापुढे पर्याय राहिलेला नाही. तूर्त चांगला भाव देऊ, या आश्वासनावरच मासळीची विक्री सुरु झाली असून मच्छीमारांना उचल दिली जात आहे.आधीच मासळीचा दुष्काळ त्यात समुद्रातील ओएनजीसीच्या सर्वेक्षणामुळे मासेमारी व्यवसाय संकटात आहे.डिझेल, बर्फ, जाळी, बोटीची देखभाल-दुरुस्ती तसेच खलाशांवर होणारा खर्च वाढला आहे. त्यातच आताचा व्यापाºयाचा दर पाहता यंदा प्रत्येक टनामागे मच्छीमारांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे.पापलेटचे दर मोठ्या प्रमाणात पडल्याने सर्वच मच्छीमार बंदरावर चिंतेचे वातावरण आहे. या प्रकरणी विविध मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी रेमंड बांड्या, लिओ कोलासो, बर्नड डिमेलो , संजय कोळी, रवींद्र म्हात्रे , विजय थाटू, विल्यम गोविंद, नेव्हिल डिसोझा, जोजफ मनोरकर, प्रकाश कोळी, अनिल फाटक, पिटर गंडोली आदींची उत्तनच्या संजय पतसंस्थेच्या कार्यालयात या संदर्भात बैठक झाली. त्यात निर्यातदार कंपन्यांशी चर्चा करु; अन्यथा शासनाकडे दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्यातदार व्यापारी कंपन्यांकडून दराला प्रतिसाद न मिळाल्याने आता सरकारकडे दाद मागण्यासह आंदोलनाचा पावित्रा मच्छीमारांनी घेतला आहे.राज्यातीला मच्छीमारांकडून गुजरातचे निर्यातदार मोठ्या प्रमाणात पापलेटसह वेगवेगळी मासळी खरेदी करतात. पूर्वी राज्यात असणाºया बड्या मासळी निर्यातदार कंपन्या बंद पडल्याने मच्छीमारांना गुजरातवरच अवलंबून रहावे लागते. हमीभाव किंवा निर्यातदारांवर शासनाचे नियंत्रण नसल्याने मच्छीमारांची सतत पिळवणूक होते.