शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांतील रस्त्यांसाठी ३२७ कोटी रुपये द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:22 IST

केडीएमसीची राज्य सरकारकडे मागणी; चाळण झाल्याने नव्यानेच बनवावे लागणार रस्ते

कल्याण : केडीएमसी हद्दीतील २७ गावांतील १९० किलोमीटर लांबीचे डांबरी रस्ते पुराच्या पाण्याने वाहून गेले आहेत. त्यामुळे त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यांसाठी निधी नसल्याने राज्य सरकारने ३२७ कोटी रुपयांचा विशेष निधी द्यावा, अशी मागणी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी नगरविकास खात्याकडे केली आहे.१९८३ पासून २७ गावे महापालिका हद्दीत होती. या गावांना मूलभूत सोयीसुविधा पुरवल्या जात नसल्याने ती महापालिकेतून वगळण्याची मागणी केली गेली. तत्कालीन सरकारने ही गावे २००२ मध्ये महापालिकेतून वगळली. मात्र, पुन्हा जून २०१५ मध्ये ही गावे महापालिकेत समाविष्ट केली गेली. तेव्हापासून या गावांतील डांबरी रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीवर खर्च केलेला नव्हता. त्यातच २६, २७ जुलै आणि ४ आॅगस्टला झालेली अतिवृष्टी व पुरामुळे २७ गावांतील रस्त्यांची चाळण झाली आहे.२७ गावांमधील १९० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांपैकी ७८ किलोमीटर लांबीचे प्रमुख रस्ते आहेत. २७ गावांतील ९-आय या प्रभाग क्षेत्राच्या हद्दीत ४४ किलोमीटर आणि १० ई प्रभाग क्षेत्राच्या हद्दीत ३४ किलोमीटर रस्त्यांचे काम करावे लागणार आहे. या रस्त्यांवरील केवळ खड्डे भरून चालणार नसून, तेथे नव्याने रस्ते बांधावे लागणार आहेत. त्यासाठी ३२७ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. हा निधी सरकारने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी सांगितले की, २७ गावांतील रस्त्यांची दुरवस्था जास्त असल्याने त्यांचा प्रस्ताव आधी तयार करून राज्य सरकारकडे निधीची मागणी आयुक्तांमार्फत केली आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचेही सर्वेक्षण सुरू आहे. त्याचाही एक सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे.निधी मिळण्याबाबत साशंकताजून २०१५ पासून २७ गावे महापालिकेत आल्यावर महापालिकेची हद्द वाढली. त्यामुळे महापालिकेस एक हजार कोटी रुपये हद्दवाढ अनुदान मिळावे, अशी मागणी माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सरकारकडे अनेकदा केली. त्याचबरोबर मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनीही यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. अनुदान दिले जात नसल्यास ही गावे महापालिकेतून वगळावी, अशीही मागणी त्यांनी केली होती. मात्र, तरीही सरकारने अनुदान देण्याविषयी कोणताच शब्द काढलेला नाही. यामुळे रस्त्यांसाठी विशेष निधी देण्याच्या मागणीचा सरकारकडून विचार केला जाईल का, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.पुन्हा एमएमआरडीएच्या गळ्यात रस्ते?शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने पक्षाच्या नगरसेवकांची एक बैठक मुख्यमंत्र्यांसोबत वर्षभरापूर्वी झाली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढ अनुदानासाठी सरकारची अनुकूलता नाही, असे संकेत देत २७ गावांतील विकासकामे एमएमआरडीएद्वारे केली जातील, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे २७ गावांतील रस्ते विकासाचे घोंगडे पुन्हा एमएमआरडीएच्या गळ्यात मारले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा