शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाटलांना कचराकुंडीची समस्याही सुटेना !

By admin | Updated: September 1, 2015 04:30 IST

प्यायला पाणी आहे, पण चालायला धड रस्ते नाहीत, घर आहे पण स्वास्थ्य नाही. स्मशानभूमी आहे तर अंत्यसंस्कारांची सुविधा नाही, अशी बकाल स्थिती आहे जुन्या डोंबिवली

अनिकेत घमंडी, डोंबिवलीप्यायला पाणी आहे, पण चालायला धड रस्ते नाहीत, घर आहे पण स्वास्थ्य नाही. स्मशानभूमी आहे तर अंत्यसंस्कारांची सुविधा नाही, अशी बकाल स्थिती आहे जुन्या डोंबिवली या ७२ क्रमांकाच्या वॉर्डाची. याच वॉर्डातून माजी महापौर निवडून गेल्या होत्या. त्यानंतर तीन टर्म रामदास पाटील निवडून आले आहेत. गल्लीबोळांतून रस्ता काढताना नागरिकांच्या नाकीनऊ आले असतानाच गेल्या २० वर्षांपासून असलेली कचराकुंडी हटता हटत नसल्याने पाटील यांच्यासह ठाकूरवाडीतील रहिवासी हैराण झाले आहेत. त्या ठिकाणी आजूबाजूच्या चार वॉर्डांचा कचरा येऊन पडत आहे. त्यासाठी परिसरातील शेकडो रहिवाशांनी नगरसेवकाला पत्रे दिली असून नागरिक विरुद्ध नगरसेवक असा संघर्ष पेटला आहे. अनेकांना दम्याचाही त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे वॉर्डात अन्यत्र आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरसेवक सक्षम आहे तर तो का सुटला नाही, असा संतप्त सवाल ज्येष्ठ नागरिक अविनाश भिंगार्डे यांनी केला. घाणामुळे तेथे मोकाट कुत्री येतात आणि ती सर्व कचरा अस्ताव्यस्त करतात. कचरा उचलणाऱ्या गाडीतून पडणारे घाण पाणी येथेच रस्त्यावर पडते. त्यामुळेही परिसरात दुर्गंधी आणि रोगराईचे वातावरण होते. या ठिकाणच्या सुमारे १०-१२ भूखंडांवर आरक्षण आहे. त्यातील स्मशानभूमीच्या ठिकाणी ती बांधण्यात आली असून अन्य निधीअभावी तसेच पडून आहेत. स्मशानभूमीसह गणेशघाट अद्ययावत करण्यात आलेला नाही. पाच हजारांहून अधिक गणपतींचे या ठिकाणी विसर्जन होते. त्या वेळी भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेकडून काळजी घेण्यात येत असली तरीही रस्ते अरुंद असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांची प्रचंड गैरसोय होते. विस्तीर्ण खाडीकिनारा असून तो संरक्षित नाही. चिंचोळ्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने केडीएमटीची बसही येथे येत नाही.