शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्टसाठी पडताळणी आता होणार घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 03:29 IST

ठाणे : प्रवास, शिक्षण अथवा पर्यटनासाठी परदेशात जाणाºयांसाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी पारपत्रपडताळणी (पासपोर्ट) अत्यंत सोपी केली आहे.

जितेंद्र कालेकर ठाणे : प्रवास, शिक्षण अथवा पर्यटनासाठी परदेशात जाणाºयांसाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी पारपत्रपडताळणी (पासपोर्ट) अत्यंत सोपी केली आहे. संबंधित अर्जदाराने पासपोर्टसाठी आॅनलाइन अर्ज केल्यानंतर पोलीस संपूर्ण माहिती घेण्यासाठी टॅब घेऊनच घरी पोहोचणार आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात जाण्याचीही गरज नसल्यामुळे लोकांचा वेळ आणि खर्चही वाचणार असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.केंद्र शासनाच्या गतिमान आणि पारदर्शक शासन योजनेंतर्गत पासपोर्ट विभागाने ही योजना राबवण्याचे देशभरातील पोलीस यंत्रणांना सूचित केले आहे. राज्यात काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये ही योजना कार्यान्वित झाली असून त्यामध्ये ठाणे ग्रामीणचाही समावेश आहे. त्यानुसार, सुमारे अडीच लाख रुपये खर्चातून १७ पोलीस ठाण्यांचे प्रत्येकी दोन कर्मचारी आणि अधीक्षक कार्यालयासाठी एक असे १८ टॅब खरेदी करण्यात आले. पासपोर्टच्या पडताळणीसाठी पोलिसांनी ‘एम पासपोर्ट’ हे अ‍ॅप सुरू केले आहे. पडताळणीच्या कामासाठी दोनदोन महिनेही लागत होते. आता हे काम अवघ्या एका आठवड्यात तेही खर्चाविना केले जात आहे.>कागदपत्रेही जागीच स्कॅन केली जातातपासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर त्याची फाइल तो वास्तव्यास असलेल्या ठाणे ग्रामीणच्या संबंधित पोलीस ठाण्यात पाठवली जाते.ती आल्यानंतर त्या पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी संबंधितांच्या घरी जाऊन वास्तव्याची तसेच इतर कागदपत्रांची पडताळणी करतात. त्याच वेळी त्याच्याविरुद्ध कोणता गुन्हा वगैरे दाखल आहे किंवा कसे, याचीही माहिती घेतली जाते.ही माहिती घेतल्यानंतर जागीच त्याचा फोटो घेऊन कागदपत्रेही टॅबद्वारेच स्कॅन केली जातात.ही माहिती दुसºयाच दिवशी पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठवली जाते. साधारण तीन ते पाच दिवसांमध्ये ही संपूर्ण पडताळणी झाल्यानंतर संबंधितांना आॅनलाइन पडताळणी झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.>पूर्वी पासपोर्टच्या पडताळणीसाठी नागरिकांना पोलीस ठाण्यात बºयाच फेºया माराव्या लागत होत्या. आता केंद्र शासनाच्या गतिमान आणि पारदर्शक शासन धोरणांतर्गत पासपोर्ट कार्यालयाच्या मदतीने पासपोर्टसाठी ही घरपोच सेवा नागरिकांना ठाणे ग्रामीणच्या १७ पोलीस ठाण्यांत सुरू केली आहे. त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षणही दिले आहे. घरी आलेल्या पोलिसांकडून सौजन्याची वागणूक मिळाल्यानंतर पोलिसांची प्रतिमाही सुधारण्यास मदत होते. कामात गती येऊन लोकांचाही वेळ वाचतो. शिवाय, कामातही पारदर्शकता येते.- डॉ. महेश पाटील, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण