शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्ट उपकेंद्रासाठी जागेचा अडसर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 03:28 IST

ठाण्यातील पासपोर्ट सेवा केंद्रातील वाढती गर्दी लक्षात घेऊन डोंबिवलीतही पासपोर्ट उपकेंद्र सुरू करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे केली होती. मात्र, या केंद्रासाठी परराष्ट्र मंत्रालयाला डोंबिवलीत सुसज्ज जागा मिळत नाही.

- अनिकेत घमंडीडोंबिवली : ठाण्यातील पासपोर्ट सेवा केंद्रातील वाढती गर्दी लक्षात घेऊन डोंबिवलीतही पासपोर्ट उपकेंद्र सुरू करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे केली होती. मात्र, या केंद्रासाठी परराष्ट्र मंत्रालयाला डोंबिवलीत सुसज्ज जागा मिळत नाही. तसेच तांत्रिक अडचणींमुळे हा प्रस्ताव प्रलंबित ठेवला आहे, अशी माहिती पासपोर्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.डोंबिवलीत पासपोर्ट उपकेंद्र सुरू करावे, या मागणीसाठी शिंदे यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे पत्रव्यवहार करत त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी डोंबिवलीत उपकेंद्र सुरू करण्यास सकारात्मकता दर्शवली होती. परंतु, एका पासपोर्ट केंद्रापासून २५ किलोमीटर अंतराच्या आत दुसरे केंद्र सुरू करता येत नाही. डोंबिवलीत हे केंद्र सुरू करण्यासाठी टपाल कार्यालयाचे मुख्य कार्यालय आणि सुसज्ज जागाही नाही. शिवाय, पासपोर्ट केंद्राची यंत्रणा राबवण्यासाठीच्या नियमांची पूर्तता होत नसल्याची तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे डोंबिवलीतही उपकेंद्र सुरू करता येत नसल्याचा व्यवहार्यता (फिजिबिलिटी) अहवालही पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.डोंबिवलीच्या प्रस्तावादरम्यान विक्रोळी येथेही पासपोर्ट उपकेंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव गेला होता. तेथे हे केंद्र सुरू झाले आहे. रत्नागिरी परिसरातही उपकेंद्र सुरू करण्याचा विचार आहे. पण, असे असतानाही डोंबिवलीतील केंद्र सुरू करण्यासाठी हालचाली मंदावल्या आहेत.डोंबिवलीत एमआयडीसी परिसरातील टपाल कार्यालयात मुबलक जागा आहे. त्या जागेचे फोटो तसेच पत्रव्यवहार परराष्ट्र मंत्रालयाशी केला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी डोंबिवलीत पासपोर्ट उपकेंद्रासाठी पाठपुरावा करून ते लवकरच सुरू केले जाईल.-डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार

टॅग्स :passportपासपोर्टdombivaliडोंबिवली