शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रथम दर्जाच्या डब्ब्यात सेंकड क्लासचे प्रवासी; महिलेची ट्विटद्वारे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 20:41 IST

ठाणे : डोंबिवली लोकलमधील महिलांच्या प्रथम दर्जाच्या डब्ब्यात सेंकड क्लासचे प्रवासी बसत असल्याच्या एका ट्विट ने बुधवारी रात्री ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालय आणि तिकिट निरीक्षकांची धावपळ उडाली. याचदरम्यान,ठाणे रेल्वे स्थानकात त्या लोकलसह अन्य दोन अशा तीन लोकलमधून ठाण्यात उतरलेल्या प्रवाशांची तिकीट तपासणी केली असता प्रथम दर्जाच्या डब्ब्यातून प्रवास करणा-या आणि ...

ठळक मुद्दे बुधवारी रात्रीच्या ८.५५ ची डोंबिवली लोकल सुमारे १० जणांना पकडले

ठाणे : डोंबिवली लोकलमधील महिलांच्या प्रथम दर्जाच्या डब्ब्यात सेंकड क्लासचे प्रवासी बसत असल्याच्या एका ट्विटने बुधवारी रात्री ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालय आणि तिकिट निरीक्षकांची धावपळ उडाली. याचदरम्यान,ठाणे रेल्वे स्थानकात त्या लोकलसह अन्य दोन अशा तीन लोकलमधून ठाण्यात उतरलेल्या प्रवाशांची तिकीट तपासणी केली असता प्रथम दर्जाच्या डब्ब्यातून प्रवास करणा-या आणि सेंकड क्लासचे तिकिट असणा-या ९ ते १० जणांना पकडल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे रेल्वे स्थानकातून रात्री जाणारी ८.५५ ची धीम्या मार्गावरील डोंबिवली लोकलमधील महिला प्रथम दर्जाच्या डब्ब्यातून एका महिलेने सेंकड क्लासमधील काही प्रवासी चढल्याची तक्रार रेल्वे ट्विट सेलवर केली. त्या तक्रारीनुसार,ट्विट सेलने ती माहिती ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयाला देऊन कारवाई करण्याबाबत सुचना केल्या. त्यानुसार, चार तिकिट निरीक्षक आणि चार रेल्वे सुरक्षा बलाचे जवान रेल्वे स्थानकात तातडीने तैनात केले. रात्रीच्या ८.५५ वाच्या डोंबिवली लोकलसह अन्य दोन गाड्यांमधील प्रथम दर्जाच्या डब्ब्यातून ठाण्यात उतरलेल्या प्रवाशांच्या तिकिटाची तपासणी केली. त्यावेळी ९ ते १० जणांना पकडल्याची माहिती ठाणे प्रबंधक कार्यालयाने दिली. दरम्यान, यावेळी प्रवासी आणि तिकिट निरीक्षकांमध्ये खटकेही उडले. त्यावेळी सुटण्यासाठी काहींनी चुकून डब्ब्यात चढल्याचे कारण दिले. तरीसुद्धा निरीक्षकांनी त्यांचे काही न ऐकता, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

 

 

टॅग्स :thaneठाणेRailway Passengerरेल्वे प्रवासी