शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारासाठी पक्षांची सोशल मीडियाला पसंती

By admin | Updated: January 15, 2017 05:17 IST

यंदाच्या महापालिका निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर पक्षांकडून केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच तुमच्या

- प्रज्ञा म्हात्रे,  ठाणे यंदाच्या महापालिका निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर पक्षांकडून केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच तुमच्या मोबाइल, लॅपटॉपवरही निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोप, यांचे पडघम वाजू लागतील.यंदा शिवसेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी हे पक्ष प्रचारासाठी सोशल मीडियाचा आधार घेणार आहेत. या पक्षांनी फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅप यांचा वापर केला आहे. प्रत्येक प्रभागातील तरुणांना सोशल मीडियाद्वारे प्रचार करण्याकरिता तयार केले आहे. प्रत्येक प्रभागातील ६० तरुण यासाठी निवडले आहेत. ही मुले १२ तास सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहणार आहेत. या सोशल साइट्सद्वारे थेट लोकांशी आम्ही कनेक्ट राहणार आहोत. तसेच, पक्षाचे अधिकृत पेज तयार केले असून त्यावर येणारे संदेश सोशल साइट्सद्वारे पोहोचवले जाणार आहे. मतदारांचे ग्रुप तयार करण्याच्या सूचनाही या तरुणांना दिल्या आहेत, असे मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. यासंदर्भात मनसेतर्फे २५ जानेवारीला गडकरी रंगायतन येथे सोशल मीडिया सेलचा मेळावा होत आहे. यात कसा प्रचार करावा, समोरच्या व्यक्तीच्या प्रश्नाला कसे आणि काय उत्तर द्यावे, याचे मार्गदर्शन केले जाईल, असे जाधव यांनी सांगितले. आम्ही प्रचारासाठी डिजिटल मीडियाचाही वापर करणार आहोत. सोशल मीडियामध्ये फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटरवर भर असेल. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे पेजेसही तयार केले आहे, असे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवाराचा प्रचार केला जाणार आहे. उमेदवार जाहीर झाले की, त्यांचे पेज तयार केले जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले. कार्यकर्त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केले आहे. त्यानंतर, उमेदवार मतदारांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. भाजपाचे जे सदस्य झालेत, त्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. परंतु, सोशल मीडियाबरोबर आम्ही वैयक्तिक संपर्कावर भर देणार आहोत. मतदारांच्या गाठीभेटी हा महत्त्वाचा भाग राहील, असे भाजपाचे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितले.