शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

ठाण्यात लाखाचा पोपट उडाला भुर्र...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:09 IST

कोपरीतील नितीन भोईर यांच्या कुटुंबात गेली पाच वर्षे सदस्याप्रमाणे वावरणारा लाखाच्या किंमतीचा ‘सिझर’ नावाचा पोपट दोन दिवसांपूर्वी अचानकपणे उडून गेला

ठाणे : कोपरीतील नितीन भोईर यांच्या कुटुंबात गेली पाच वर्षे सदस्याप्रमाणे वावरणारा लाखाच्या किंमतीचा ‘सिझर’ नावाचा पोपट दोन दिवसांपूर्वी अचानकपणे उडून गेला. या ‘बोलक्या’ जिवाने सहवास सोडल्यापासून घरातील चैतन्यच हरविले आहे. त्यामुळे त्याला शोधून देणा-याला मोठे बक्षीस देण्याची तयारी या कुटुंबाने दाखवली अहे.भोईर यांच्या दिवसाची सुरूवातच सिझरच्या जय माता दी आणि जय सद्गुरू या जयघोषाने होत असे. अतिशय दुर्मीळ आणि बडबड्या म्हणून ओळखला जाणारा ग्रे आफ्रिकन जातीचा हा पोपट भोईर यांनी पाच वर्षांपूर्वी पुण्यातून विकत घेतला तेव्हा तो काही महिन्यांचाच होता. पुढे कुटुंबातील सर्वांचा लाडका बनलेला ‘सिझर’ कठीणात कठीण शब्दही सहज बोलू शकत होता. ‘सिझर’च्या टिवटिवाटाने घरभर वेगळेच चैतन्य रहायचे. त्याच्यासाठी स्वतंत्र घराच्या रूपाने आकर्षक पिंजरा होता. मात्र सिझरला कधी पिंजºयात ठेवण्याची गरजच भासली नाही. दिवसभर संपूर्ण बंगल्यात त्याचा मुक्त संचार असायचा. नितीन भोईर यांना तो पप्पा आणि त्यांच्या पत्नी टिना यांना मम्मी म्हणून हाक मारायचा. त्यांची मुलं दिया, हिनल आणि वेदांतसोबत एखाद्या मुलाप्रमाणेच तो घरात वावरला. दोन दिवसांपूर्वी तो अचनाक खिडकीतून उडाला अणि घरातील चैतन्यही सोबत घेऊन गेला. त्याच्या शोधात भोईर यांनी जवळपासचा वनाचा परिसर पिंजून काढला. स्वत:च्या फेसबुकवर त्याचे फोटो, व्हिडीओ अपलोड करून मित्रमंडळीना मदत करण्याचे आवाहनही केले. मात्र सिझरचा ठावठिकाणा न लागल्याने भोईर कुटुंबियांची तहान-भूक हरवली आहे.