शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांच्या दौैऱ्याचे फलित शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:26 IST

कल्याणमधील वास्तव : स्कायवॉकवर फेरीवाले, कचऱ्याचे साम्राज्य कायम

कल्याण : भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी रविवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघात येणाºया कल्याण पश्चिमेकडील रेल्वेस्थानकातील स्कायवॉकची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी तेथील कचºयाचे साम्राज्य पाहता केडीएमसीचे ‘क’ प्रभाग अधिकारी भारत पवार यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यामुळे तेथील परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा होती. परंतु, दौºयाच्या वेळी गायब झालेल्या फेरीवाले येथे बिनदिक्कतपणे पुन्हा व्यवसाय करू लागले आहेत. परिणामी, त्यांच्याकडून होणाºया कचºयामुळे स्कायवॉकवर बकाल अवस्था पाहायला मिळत आहे.

रेल्वेस्थानक परिसरातील केडीएमसीचा स्कायवॉक हा पादचारी आणि प्रवाशांसाठी बांधण्यात आला असलातरी महापालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने स्कायवॉकवर सर्रासपणे फेरीवाल्यांकडून व्यवसाय थाटले जात आहेत. आयुक्तांसह सत्ताधाºयांनीही या परिस्थितीकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने स्कायवॉकवर फेरीवाल्यांसह भिकारी, गर्दुल्ले, वारांगना यांचाही वावर सातत्याने असतो. स्कायवॉकवर अस्वच्छतेचे सम्राज्यही असते. एकप्रकारे हा स्कायवॉक त्यांना आंदण दिल्याचे चित्र पाटील यांच्या दौºयानंतरही पाहायला मिळत आहे.

फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि अस्वच्छता यासंदर्भात प्रवाशांकडून आलेल्या तक्रारींवरून पाटील यांनी रविवारी कल्याण रेल्वेस्थानकाला भेट देत पश्चिमेतील स्कायवॉकची पाहणी केली. यावेळी खासदारांसमवेत आमदार नरेंद्र पवार हेदेखील होते. खासदारांचा दौरा होणार, याची माहिती मिळताच फेरीवाले गायब झाले होते. मात्र, पाटील यांना दौºयादरम्यान स्कायवॉकवर अस्वच्छतेचे दर्शन घडल्याने त्यांनी प्रभाग अधिकारी पवार यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी मोबाइलवर आलेल्या तक्रारी आणि फोटोही खासदारांनी त्यांना दाखवले होते. पाटील यांनी दौºयात प्रवाशांशीही संवाद साधत त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या होत्या.स्कायवॉकवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि गर्दुल्ल्यांचा, भिकाºयांचा प्रवासी व पादचाºयांना होणारा त्रास पाहता अधिकारी आणि पोलीस यांची विशेष बैठक घेतली जाईल, असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले होते.

तर, केडीएमसी आणि रेल्वे प्रशासन यांनी समन्वय साधून प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण करावे, असे आदेशही संबंधित अधिकाºयांना पाटील यांनी दिले होते. परंतु, दौरा होऊनही स्कायवॉकवरची परिस्थिती ‘जैसे थे’च राहिल्याचे पाहायला मिळत आहे.फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या कचºयाचे चित्र पाहता खासदारांच्या दौºयाने काय साधले, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.