शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंग प्लाझाला मिळणार ऑक्सिजन; रुग्णांसाठी ३५० बेडची लवकरच साेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 00:12 IST

विपीन शर्मा यांची माहिती : कंपनी प्रतिनिधींची आज स्पाॅट व्हिजिट 

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सदस्यांनी ज्या काही समस्या, अडीअडचणी मांडल्या, त्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. ऑक्सिजनसाठी अतिरिक्त आयुक्त हे स्वत: संबंधित कंपनीकडे गेले होते. त्यानुसार आज, बुधवारी कंपनीचे प्रतिनिधी स्पॉट व्हिजिट केल्यानंतर तत्काळ ॲग्रीमेंट करून ऑक्सिजन उपलब्ध होईल. त्यानुसार एका तासात पार्किंग प्लाझा येथील ३५० ऑक्सिजन बेड सुरू होऊ शकणार आहेत. मनुष्यबळ वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली.

सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत प्रशासनावर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते बोलत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिविर व ऑक्सिजनचे अधिकार त्यांच्याकडे ठेवले आहेत. महापालिका त्यांच्या यादीत नाही, खासगी रुग्णालयांचा केवळ समावेश आहे, त्यामुळे आपल्याला रेमडेसिविर मिळत नाही. रेमडेसिविरचा दोन दिवसांत साठा उपलब्ध होणार आहे. मुंब्रा कोविड सेंटर सुरू झाले आहे. वॉररूमचा विषय सोडविण्यासाठी मी स्वत: पाहणी करून बैठक घेऊन विषय मार्गी लावणार आहे. मागील काही दिवसांत रुग्ण वाढ होत असली तरी अधिकची होताना दिसत नाही, ही दिलासादायक बाब आहे.रुग्णांना १२ तासांत बेड उपलब्ध होत आहेत. ग्लोबलमध्ये १५० ऑक्सिजन बेड वाढविले आहेत. तसेच आयसीयुचे २५ बेड वाढविण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

ऑक्सिजनसाठी तीन नवीन प्लांटतयार दोन प्लांट १७५ मेट्रिक टन क्षमतेचे असणार आहे. रोजच्या रोज ३५० सिलिंडर मिळणार आहेत. खासगी रुग्णालयांना मदत देता येणार आहे. ३०० सिलिंडर शिल्लक राहणार असल्याने ३०० ऑक्सिजन बेड वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्यानुसार पार्किंग प्लाझा येथे ८०० बेड ऑक्सिजनचे असणार आहेत, तर आणखी एक प्लांन्ट उभारला जाणार आहे. याचा खर्च एमएमआरडीए उचलणार आहे.

या महिन्याचा पगार मिळण्यास उशीरशासनाचे अनुदान मिळण्यास उशीर झाल्याने या महिन्याचा पगार उशिराने होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मेडिसीनचा तुटवडा नाही, रेमडेसिविरचा दोन दिवसांत पुरवठा मिळेल, अशी आशा आहे. सध्या ठाण्याला लसीकरणाचा योग्य पुरवठा होत नाही. आता नवीन डोस न आल्याने बुधवारी लसीकरण बंद ठेवण्यात येणार असल्याची माहितीदेखील आयुक्तांनी यावेळी दिली.