शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्या विद्यार्थ्यांसह पालक धडकले पालिकेवर, कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे स्थलांतर होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 14:23 IST

वारंवार मागणी करुनही विद्यार्थ्यांचे स्थलांतर सुरुच ठेवल्याने शुक्रवारी संतप्त झालेल्या पालकांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांनी महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देखाजगी संस्थेला शाळा देण्याचा निर्णय रद्द करावाविद्यार्थ्यांना धोकादायक जागेत टाकू नये

ठाणे - ठाणे महापालिकेच्या सावरकर नगर भागातील शाळा क्रमांक १०३ मधील इंग्रजी माध्यमाच्या ज्युनिअर, सीनिअरच्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना विश्वासात न घेता, येथील सुमारे १०८ विद्यार्थ्यांचे स्थलातंर करण्याचा घाट घातला जात आहे. याबाबत शिक्षण विभागाशी चर्चा करुनही त्यांनी आपली भुमिका न बदल्याने अखेर शुक्रवारी संतप्त पालक आणि त्यांच्या पाल्यांनी महापालिकेवर धरणे आंदोलन केले. याचे नेतृत्व आम आदमी पार्टी आणि ठाणे मतदाता जागरण अभियानने केले होते. यावेळी कोणत्याही परिस्थिती मुलांचे स्थलांतर होऊ देणार नसल्याचा इशारा यावेळी आंदोलन कर्त्यांनी दिला.                     सावरकर नगर येथील ठाणे महापालिकेची इंग्रजी शाळेतील पूर्व प्राथमिक वर्ग हे खाजगी संस्थेला सुरु करण्यासाठी दिले आहेत. परंतु शिक्षण समितीचा हा डाव आम्ही हाणून पाडू असा इशारा देत शाळा बचाव - पालक करणार रस्त्यावर आंदोलन केले जाईल असा इशारा पालकांनी यापूर्वी दिला होता. परंतु शिक्षण विभागाने आपला हट्ट न सोडल्याने अखेर शुक्रवारी पूर्व प्राथमिकचे सर्व लहान विद्यार्थी महापालिका मुख्यालयावर धरणे आंदोलनाला बसले होते. नवीन वर्ग तयार झाल्याशिवाय मुलांना हलविले जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने कबुल केले होते. परंतु त्या आधीच विद्यार्थ्यांना स्थलांतरीत करण्याचा घाट घातला जात आहे. त्यांच्या शाळेचे वर्ग खाजगी संस्थेला चालविण्यासाठी दिले जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे ही शाळा इमारत खाजगी संस्थेला देण्याचा निर्णय रद्द करावा, लहान मुलांचे स्थलांतर करु नये आणि त्यांना सुरक्षित जागेतून धोकादायक व अडचणीच्या जागेत पाठवू नये अशी यावेळी मागणी करण्यात आली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त