शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आधारवाडी डम्पिंगवर बहरणार नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 00:12 IST

फुले, फळांची बाग साकारणार : प्रभाग अधिकाऱ्यांनी केली पाहणी

कल्याण : केडीएमसीच्या बहुचर्चित आधारवाडीतील डम्पिंग ग्राउंडचा कायापालट करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे. त्याठिकाणी कर्जत नगरपालिकेच्या धर्तीवर डम्पिंग ग्राउंडवर फुले आणि फळांची बाग साकारण्याचा प्रकल्प राबवला जाणार आहे. यासंदर्भात महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शनिवारी कर्जत येथील डम्पिंग प्रकल्पाची पाहणी केली. हा प्रकल्प कल्याणमधील आधारवाडी ग्राउंडवर राबवण्यासंदर्भात लवकरच आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष आढावा बैठक होणार आहे.केडीएमसी परिक्षेत्रातील कचरा कल्याण पश्चिमेतील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. हे डम्पिंग बंद करण्यात येणार असले, तरी तारीख प्रशासनाने जाहीर केलेली नाही. या डम्पिंगवर आता कर्जत डम्पिंगच्या धर्तीवर सुंदर बगिचा, फळबाग, फुलबाग उभी करण्यात येणार आहे. कर्जत नगरपालिकेने साडेचार एकर जमिनीच्या डम्पिंग ग्राउंडवर बगिचा फुलविला आहे. यात फळबाग आणि फुलबाग साकारण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त कोकरे यांनी गेल्या आठवड्यात आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा कर्जत डम्पिंग पाहणी दौरा केला. शनिवारीही सर्व प्रभाग अधिकाºयांना त्याठिकाणी नेण्यात आले होते. कल्याणमधील डम्पिंगवर कर्जत येथील डम्पिंग ग्राउंडवर असणाºया उद्यानाप्रमाणे बाग फुलविण्याचा केडीएमसी प्रशासनाचा मानस आहे.काही दिवसांत आधारवाडी डम्पिंगचे सपाटीकरण झाल्यावर फळे, फुले, भाजीपाला मळा साकारण्याबाबत प्रस्ताव बनविला जाणार आहे. महापालिका आयुक्त सूर्यवंशी यांच्या दालनात लवकरच अधिकाºयांची आढावा बैठक घेऊ न पुढील धोरण ठरवू, अशी माहिती कोकरे यांनी दिली.काय आहे नेमका कर्जत पॅटर्न?साडेचार एकर जमिनीवर शहरातून वर्गीकरण करून सुका आणि ओला कचरा आणला जातो. त्यावर प्रक्रिया करून विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. शहरातील कचरा कसा गोळा करावा, कचरा गोळा केल्यावर त्याच्यावर प्रक्रिया कशी करू शकतो, आलेल्या कचºयातून उत्पन्न कसे वाढू शकते आणि रोजगार कसा देऊ शकतो, याचे मॉडेल कर्जत नगरपालिकेने राबवले आहे.