शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पप्पू का बेटा भी फेल हो गया...

By admin | Updated: February 24, 2017 05:54 IST

सिंधी भाषक राजकारणाला चुचकारण्यासाठी त्या समाजातील नामचीन व्यक्तींना सोबत

मिलिंद बेल्हे / उल्हासनगरसिंधी भाषक राजकारणाला चुचकारण्यासाठी त्या समाजातील नामचीन व्यक्तींना सोबत घेऊनही एकहाती सत्ता मिळत नाही, याचा धडा उल्हासनगरने भाजपाला दिला. त्यामुळे आधी पप्पू कलानी यांचा पराभव करणाऱ्या भाजपावर त्यांचा मुलगा पदरात घेऊनही फेल होण्याची वेळ आली. उल्हासनगरात मोठा भाऊ होण्यासाठी भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस फोडून ओमी कलानी आणि त्यांची टीम पक्षात घेतली. त्यातून एकहाती सत्ता स्थापन करण्याचे त्यांचे स्वप्न होते, पण त्याला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि जीवन इदनानी यांच्या साई पक्षाने शह दिला. ज्या सिंधी पक्षाच्या राजकारणाचा आधार भाजपाने घेतला, त्याच सिंधी समाजाला शिवसेनेनेही सामावून घेतले. साई पक्षाचा आधारच हा समाज आहे. त्यामुळे एकाच समाजाच्या बळावर राजकारण करता येत नाही आणि त्यांच्याच अस्मितांवर फुंकर घालत संपूर्ण शहराचे राजकारण करता येत नाही, याचाही धडा यातून राष्ट्रीय म्हणवणाऱ्या या पक्षाला मिळाला. या फोडाफोडीतून भाजपाने ११ वरून एकदम ३३ पर्यंत मजल मारली असली, तरी त्यांच्यासोबत फक्त भारिप आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे दोन सदस्य असल्याने, ते सत्तेसाठी ४० चा आकडा गाठू शकत नाहीत. सेनेनेही २५ ची संख्या गाठली असली, तरी त्यांना फक्त रिपाइंच्या आठवले गटाच्या दोन सदस्यांची सोबत आहे. त्यामुळे साई पक्षाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पक्षात मोठी फूट पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस गलितगात्र झाला होता आणि काँग्रेसलाही विजयाची फारशी आशा नव्हती.भाजपासोबत फक्त भारिप आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे दोन सदस्य असल्याने ते सत्तेसाठी ४० चा जादुई आकडा गाठू शकत नाहीत.साई पक्षाची सद्दी संपवणार?भाजपा किंवा शिवसेनेसारख्या एकाच पक्षाला बहुमत नसल्याने, साई पक्षासारख्या छोट्या पक्षांना पाच वर्षे सांभाळायचे; सत्तेच्या चाव्या त्यांच्या हाती द्यायच्या की, मुंबईच्या समीकरणांची वाट पाहायची, हे भाजपा आणि शिवसेनेला ठरवावे लागणार आहे. तसे झाले तर साई पक्षाची सद्दी संपेल.सत्तेसाठी राजकीय कडबोळे करावे लागल्याने, गेल्या १० वर्षांत उल्हासनगरच्या विकासाची वाट लागली आहे. त्यामुळे किती छोटे पक्ष, त्यांच्या अटी आणि तडजोडी सहन करायच्या, याचा निर्णय भाजपा आणि शिवसेनेला घ्यावा लागणार आहे. या दोन्ही पक्षांना एकत्र आल्याखेरीज सत्ता स्थापन करता येणार नाही, असाच या निकालाचा साधा अर्थ आहे.