शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
3
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
4
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
5
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
6
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
7
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
8
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
9
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
10
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
11
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
12
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
13
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
14
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली
15
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
16
आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!
17
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
18
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
19
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
20
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?

टिकमाणींनी दिली सेनेला सोडचिठ्ठी

By admin | Updated: February 1, 2017 03:32 IST

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीवर टीका करून कोपरीतील नगरसेवक लक्ष्मण टिकमानी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु, आता शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर नाराजी

ठाणे : काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीवर टीका करून कोपरीतील नगरसेवक लक्ष्मण टिकमानी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु, आता शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करून त्यांनी थेट भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे शिवसनेत प्रवेश केलेल्यांवर भाजपाने लक्ष केले असून काही नगरसेवक आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.युती तुटली आणि आता शिवसेना आणि भाजपा हे स्वबळावर लढणार आहेत. त्यामुळे आता उमेदवारांची पळवापळवी जोरात सुरु झाली आहे. त्यानुसार शिवसेनेने आतापर्यंत १७ तर भाजपानेदेखील तेवढेच नगरसेवक आपल्या खात्यात जमा केले होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणखी तीन दिवस शिल्लक असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत भाजपा आता शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी व्युव्हरचना आखत आहेत. त्यांच्याच या व्युहरचनेचा भाग म्हणून त्यांच्या गळाला कोपरीतील लक्ष्मण टिकमाणी सारखा मोठा मासा गाळला लागला आहे. विशेष म्हणजे टिकमाणी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्याच वेळेस भरत चव्हाण यांनीदेखील भाजपात प्रवेश केला होता. परंतु, हे दोघे आमने सामने येत असल्याने भाजपाने खेळी केली आणि चव्हाण यांच्या सोबतीला आता टिकमाणी यांनादेखील पक्षात प्रवेश देऊन त्यांनी येथील वॉर्ड मजबुत केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे हा आता शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. टिकमाणी यांना तिकीट देण्याच्या नादात सेनेने निष्ठावान शिवसैनिकाचा बळी देण्याचे ठरविले होते. आता टिकमाणी गेल्याने निष्ठावंताला न्याय मिळू शकतो.