शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

पालघर जिल्ह्यात एसटीचे वाजले बारा

By admin | Updated: September 26, 2016 02:02 IST

वसई तालुक्यातील शहरी वाहतूक टप्याटप्याने बंद करीत चाललेल्या एसटी महामंडळाने पालघर जिल्हातील विविध डेपोतून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या तब्बल ५४ बस सेवा बंद केल्या आहेत

शशी करपे,  वसईवसई तालुक्यातील शहरी वाहतूक टप्याटप्याने बंद करीत चाललेल्या एसटी महामंडळाने पालघर जिल्हातील विविध डेपोतून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या तब्बल ५४ बस सेवा बंद केल्या आहेत. एकीकडे प्रचंड तोट्यात चाललेल्या पालघर विभागाचा कार्यभार सध्या एका इंजिनिरच्या हाती सोपवण्यात आला आहे. तर अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, वाहक, चालक यांच्यासह तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मिळून ६५३ जागा रिक्त आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील एसटी दिवसेंदिवस पोरकी होत चालली आहे. वसई आणि नालासोपारा डेपोतून सुटणाऱ्या २५ मार्गावरील शहरी वाहतूक बंद करण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे. मात्र, लोकांचा वाढता विरोध आणि वसई विरार पालिकेच्या परिवहन ठेकेदाराकडे बसेसचा असलेला तुटवडा यामुळे तूर्तास या मार्गावरील बससेवा सुरु ठेवण्यात आली आहे. मात्र, एसटीने तोट्याचे कारण पुढे करीत वसई तालुक्यातील अर्नाळा, नालासोपारा आणि वसई डेपोतून सुटणाऱ्या ५५ मार्गांवरील शहरी बस वाहतूक टप्याटप्याने बंद केली आहे. २०१३ साली वसई डेपातून २९, अर्नाळा डेपोतून २१ आणि नालासोपारा डेपोतून ३० मिळून एकूण ८० मार्गावर शहरी बससेवा सुरु होती. मात्र, मार्च २०१३ पासून एसटीने टप्याटप्याने शहरी बस सेवा बंद करण्यास सुरुवात केली आहे. सध्या वसई डेपोतून ९ आणि नालासोपारा डेपोतून १६ मिळून एकूण २५ मार्गांवरच्या बस सेवा सुरु आहे. ती ही आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पालघर विभागातील डेपोतून दररोज २१ हजार ८२१ किलोमीटर धावणाऱ्या ५४ मार्गांवरील लांब पल्ल्यांच्या बससेवा बंद करण्यात आल आहेत. थेट प्रवासी मिळत नसल्याचे कारण दाखवून एसटीने लांब पल्ल्यांच्या गाड्या बंद केल आहेत. प्रत्यक्षात या गाड्या सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या होत्या. ५४ बस बंद केल्याने दररोज किमान १० ते १२ लाखांचे नुकसान होते आहे. खाजगी वाहतूकदारांच्या फायद्यासाठीच लांब पल्ल्यांच गाड्या राज्यभर बंद करण्याचा सपाटा लावला आहे. दुसरीकडे, खाजगी गाड्यांना टप्पा वाहतूक करण्यास मनाई असतानाही त्या राजरोसपणे टप्पा वाहतूक करीत असल्याने एसटीला दुहेरी फटका सहन करावा लागत आहे, असा आरोप एसटी कामगार संघटनेचे पालघर विभागीय अध्यक्ष भरत पेंढारी यांनी केला आहे. विभाग नियंत्रक दिलीप मोरे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा कार्यभार मेकॅनिकल इंजिनिअरकडे देण्यात आला आहे. विभागाच्या कार्यशाळेतील सहाय्यक मेकॅनिकल इंजिनिअरचे पद रिक्त आहे. विभागात पाच महिने झाले पूर्णवेळ वाहतूक अधिकारी नाही. मुख्यालयात तीन महिन्यांपासून अधिक्षकाचे पद रिक्त आहे. साडेतीन हजार कामगार असलेल्या विभागाला अद्याप स्वतंत्र कामगार अधिकारी नेमलेला नाही. जिल्ह्यात वसई, नालासोपारा,अर्नाळा, सफाळे, पालघर, बोईसर, डहाणू आणि जव्हार असे आठ डेपो आहेत. मात्र, जव्हार, सफाळे आणि बोईसर डेपोला स्वतंत्र मॅनेजर नाही. प्रत्येक डेपोत कार्यालयीन कर्मचारी, वाहक, चालक, तांत्रिक कर्मचाऱ्यांची कित्येक पदे रिक्त आहेत.