शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

पालघर जिल्ह्याच्या पोलीस दलाला कोरोनाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 01:17 IST

तिघांचा मृत्यू : १९१ पोलिसांना लागण, १५१ जणांची कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : जगभर हाहाकार माजवलेल्या कोरोनाने वसई तालुक्यासह पालघर जिल्ह्यातही थैमान घातले आहे. जिल्ह्यातील पोलीस दलाला कोरोनाचा वाढत असलेला विळखा चिंतेचा विषय ठरत आहे. जिल्ह्यात कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात तीन जणांचा मृत्यू झाला असून तिन्ही पोलीस वालीव पोलीस ठाणे येथे कार्यरत होते. सद्यस्थितीत पालघर जिल्हा पोलीस दलातील १९१ पोलिसांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून १५१ पोलीस कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. यातील बरे झालेले पोलीस पुन्हा कर्तव्यावरही हजर झाले आहेत.पालघरमधील वसई तालुक्यात दररोज शेकडोच्या संख्येने कोरोनाबाधित रु ग्ण सापडत आहेत. यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन वेळोवेळी नागरिकांना केले जात आहे. वसई, विरार व पालघर जिल्ह्यामध्ये ८ जूनपासून टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरी कोरोनाचे वाढते प्रमाण धक्कादायक आहे. मृतांच्या आकड्यातही लक्षणीय वाढ झाली असून रोज कोरोनातून मुक्त होणाऱ्यांचे जादा प्रमाण हीच एकमेव या काळात समाधानाची बाब ठरली आहे.

दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून त्यांच्यासमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकºया गेल्या आहेत. कामधंदे ठप्प झाले आहेत. अर्थव्यवस्थेचे चाक चिखलात रुतले आहे. हे संकट असताना अद्याप वसई, विरार व एकूणच पालघर जिल्ह्यातील कोरोनाचे संकट कमी झालेले नाही. मागील चार महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. पोलीस दलातील कर्मचारी जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे.

पालघर पोलीस दलालाही त्याचा फटका बसला आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात ज्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, ते तिघेही वालीव पोलीस ठाण्याचे कर्मचारी होते. पोलीस हवालदार किरण साळुंखे, पोलीस नाईक जितेंद्र भालेराव आणि पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खोत यांचा यात मृत्यू झाला. आतापर्यंत १५१ पोलीस कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ३७ पोलीस अधिकारी, कर्मचारी उपचार घेत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात पालघर जिल्ह्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाºयांना कोरोना होत आहे, ही बाब चिंताजनक आहे.वालीव पोलीस ठाण्यात आज तपासणीवालीव पोलीस ठाण्यातील तीन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याने सर्वत्र याच पोलीस ठाण्याची चर्चा सुरू असून भीतीचे वातावरण पसरले आहे.जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांपैकी वालीव पोलीस ठाण्यातील तिघांचा मृत्यू झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे. यामुळे वसई-विरार महानगरपालिका आरोग्य विभागातील डॉक्टरांचे एक पथक शुक्रवारी सकाळपासून पोलीस ठाण्यातील कार्यरत १२५ ते १५० पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांची रॅपिड तपासणी करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे.