शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

रुग्ण बरे होण्यात पालघर जिल्हा अव्वल; ९६.८६ टक्के रिकव्हरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 00:51 IST

ग्रामीण परिसरातील कोरोनाचिंतेचे वातावरण झाले कमी

- हितेन नाईकपालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या बरे होण्याच्या टक्केवारीमध्ये पालघर जिल्हा (९६.८६ टक्के) राज्यात सर्व जिल्ह्यांमधून अव्वल स्थानी राहिला आहे. आरोग्य विभागाने १ डिसेंबर रोजी राज्यातील आजारी रुग्णांचा घेतलेल्या आढाव्यात ही बाब समोर आली आहे. पालघरमधील रुग्ण बरे होण्याचा दर राज्यातील ३५ जिल्ह्यांतून अधिक असल्याचे आढळून आले आहे.पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १४ हजार ९१८ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी १४ हजार ४६८ रुग्ण बरे झाले आहेत.  जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या १५२  कोरोनाबाधित असून, त्यापैकी डहाणू तालुका २०, जव्हार ६, मोखाडा १, पालघर १०५, तलासरी ६, वसई ग्रामीण १, विक्रमगड २, वाडा ११ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित नागरिकांपैकी १०९ नागरिकांनी घरी विलगीकरण करून घेतले गेले. उर्वरित इतर रुग्ण विक्रमगडमधील रिव्हेरा आणि बोईसरमधील टिमा समर्पित कोरोना केंद्रांमध्ये व इतर रुग्णालयांत दाखल करण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागात २९८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनाचा मृत्युदर (सीएफआरनुसार) २.० टक्के आहे. मृत्युदरांमध्ये वसई ग्रामीण भागातील मृत्युदर ३.६ टक्के असून, वाडा, पालघर, डहाणू, मोखाडा येथील मृत्युदर सरासरीच्या जवळपास आहे. रुग्ण बरे होण्याच्या दरामध्ये जव्हार, विक्रमगड, तलासरी आणि वाडा या तालुक्यांमधील कामगिरी समाधानकारक आहे. जिल्ह्यात ४३,५५० नागरिक बाधित संपूर्ण पालघर जिल्ह्यात वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रासह ४३ हजार ५५० नागरिकांना कोरोनाबाधा झालेली असून, त्यापैकी १ हजार १७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर या जीवघेण्या आजारावर ४१ हजार ७०६ रुग्णांनी मात केली आहे.  सध्या ६७१ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उभारलेल्या व्यवस्थेने केलेल्या कामाचे हे फलित असून, नागरिकांनी आवश्यक ती सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.- डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी, पालघर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या