शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पद्मश्री अनुराधा पौडवाल यांनी सनातन धर्माला दिली आंतरराष्ट्रीय ओळख; युनायटेड किंग्डमच्या संसदेतील हाऊस ऑफ कॉमन्स पार पडला सोहळा 

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: June 1, 2024 17:57 IST

 श्री आदिशंकराचार्यांच्या शिकवणींचा प्रसार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सनातन धर्माचे महान शिक्षक, गुरु आणि तत्वज्ञ गुरु शंकराचार्य यांनी रचलेल्या ग्रंथांची श्रृंखला असलेल्या ‘ दि वर्क्स ऑफ आदि शंकराचार्य’ या सांगितीक मालिकेचे आपल्या सुमधुर वाणीतून सादरीकरण करीत पद्मश्री अनुराधा पौडवाल यांनी सनातन धर्माला  आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त करून दिली. ब्रिटीश संसदेतील युनायटेड किंग्डम येथील हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये हा  बहुसांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. 

या कार्यक्रमाचे औचित्य साधून पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल आणि बांग्लादेशी संगीतकार आसिफ अली यांच्या संयुक्त अल्बमचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. ठाणे शहरासोबत आत्मीयतेचे नाते असलेल्या अनुराधा पौडवाल यांच्या चाहत्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. या उपक्रमाचे आयोजन हे ब्रिटीश पार्लमेंटच्या खासदार  सीमा मल्होत्रा, विम्बल्डनचे लॉर्ड तारीक अहमद, मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर मिडल इस्ट, नॉर्थ अफ्रिका, साऊथ एशिया, युनायटेड नेशन्स आणि दि कॉमनवेल्थ, प्राईम मिनिस्टर्स स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह फॉर प्रिव्हेंटिंग सेक्शुअल व्हॉयलन्स इन कॉन्फ्लिक्ट, श्री. गोपी हिंदुजा, हिंदुजा ग्रुप चे प्रमुख आणि अनेक मान्यवर प्रेक्षक उपस्थित होते. या आपल्या अनुभवाबद्दल बोलताना पौडवाल म्हणाल्या की, “ सनातन धर्माची अधिकतर वेळी चुकीची व्याख्या केली जाते. पण सत्य हे आहे की हे तत्वज्ञान कालातीत आणि वैश्विक तंत्वज्ञान आहे जे वैयक्तिक बलस्थाने, सुसंवाद आणि सर्वसमावेशक पध्दतीचा प्रसार करतात. त्यांची शिकवण ही मानसिक शांतता, अध्यात्मिक वाढ आणि सर्व प्राणिमात्रांच्या परस्पर संबंधांना महत्त्व देते. या मुल्यांचा प्रसार करुन त्यांची शिकवण ही जगभरांतील विविध संस्कृतींनी एकाच मंचावर एकत्र येऊन एकमेकांचा सन्मान आणि समजून घेण्यावर भर दिला जातो. जगभरांतील प्रेक्षकांसमोर शांतीचा आणि एकतेचा हा संदेश प्रसारीत करण्यासाठी मी वचनबध्द आहे.” 

टॅग्स :Anuradha Paudwalअनुराधा पौडवाल