शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडल्याने भातशेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 00:17 IST

कंपनी प्रशासनावर कारवाई करा : शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी

वाडा : तालुक्यातील कुडूस येथील धोडी केमटेक्स या कंपनीने रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडल्याने हे पाणी काही शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने भातशेती वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने पाहणी करून या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.वाडा तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत धोडी केमटेक्स प्रा.लि. ही कंपनी असून येथे क्लोरिनपासून पाणी शुद्ध करण्याच्या पावडरचे उत्पादन केले जाते. या कंपनीने रासायनिक सांडपाणी सोडण्यासाठी बनवलेला सेफ्टी टँक हा खूपच लहान असल्याने पाणी साठवून ठेवण्याची त्याची क्षमता कमी असल्याने कंपनी काही वेळा रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडत असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.

या रासायनिक पाण्यामुळे वडवली, चिंचघर पाडा, मुसारणे, घोणसई, डाकिवली या गावातील नाल्यालगत असलेल्या शेतजमिनीत हे पाणी जाऊ लागले आहे. परिणामी येथील शेतकऱ्यांचे भातपीक धोक्यात आले आहे. तसेच या गावातील गाई, म्हशी या नाल्यातील पाणी पीत असल्याने त्यांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे पाणी त्वरित बंद करून या व अशा अन्य कंपन्यांवर कारवाई करण्याचे निवेदन शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, पंचायत समितीचे सभापती योगेश गवा, जि.प. सदस्य राजेश मुकणे, तालुकाप्रमुख उमेश पठारे, पंचायत समिती सदस्य अमोल पाटील, राजेश सातवी, रघुनाथ पाटील, तालुका सचिव निलेश पाटील आदी या वेळी उपस्थित होते.नाल्यात सोडलेले रासायनिक पाणी आमच्या कंपनीतील नाही. कारण कंपनीला संरक्षक भिंत असल्याने पाणी बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही.- उमाकांत पांडा, कंपनी व्यवस्थापक

 

टॅग्स :thaneठाणे