शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

ऑक्सिजन, रेमडेसिविर, लसही वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 00:11 IST

ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच साठा

अजित मांडकेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कोविड सेंटरमध्ये केवळ एक दिवसाचाच साठा शिल्लक असून, खासगी रुग्णालयांना अद्यापही रेमडेसिविर मिळालेले नाही. दुसरीकडे, ठाणे महानगरपालिकेच्या कोविड सेंटरमध्येही केवळ एक दिवसाचाच साठा शिल्लक राहिल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही कोरोनापासून रोखण्यासाठी लसीकरण सुरू असले तरी ठाणे महापालिकेकडे पुढील दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यामुळे आता महापालिकेची आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनवर आली असून ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि लसही वेटिंगवर आहे.ठाणे शहरात १ लाख ३०६ कोरोना रुग्ण असून, आतापर्यंत ८३ हजार ८९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. १५३३ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्याच्या घडीला १६ हजार ४४५ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेचे कोविड सेंटरदेखील आता अपुरे पडू लागले आहेत. अशातच पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमध्ये अद्यापही ऑक्सिजनचा पुरवठा मिळालेला नाही. ग्लोबललादेखील एक दिवसापुरताच ऑक्सिजनचा साठा असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. महापालिकेसह शहरातील विविध खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेन्टीलेटरवर ६५३ रुग्ण असून त्यातील ६३ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. परंतु, या सर्वच रुग्णांना आता ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. दुसरीकडे, खासगी कोविड रुग्णालयांनादेखील कुणी ऑक्सिजन देता का ऑक्सिजन, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. ठाणे शहराला रोज ११४ मेट्रीक टन ऑक्सिजनची सध्या गरज भासत आहे. परंतु, साठा मात्र उपलब्ध होताना दिसत नाही. त्यात ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरला ४६ मेट्रीक टन रोजच्या रोज ऑक्सिजन लागत असून त्यातील रोज २० मेट्रीक टनचाच पुरवठा महापालिकेला होत आहे. दुसरीकडे, शहरातील खासगी रुग्णालयांना रोजच्या रोज ६८ मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज असून त्यातील ६० मेट्रीक टन कसाबसा उपलब्ध होत आहे. आता तासातासाला खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपुष्टात येत असल्याने या सर्वांची निकड कशी भागवायची असा पेच आता यंत्रणेपुढे निर्माण झाला आहे. दुसरीकडे ठाणे महापालिका हद्दीतील खासगी कोविड रुग्णालयांना अद्यापही रेमडेसिविरचा पुरवठा होऊ शकलेला नाही. दुसरीकडे महापालिकेच्या माध्यमातून ग्लोबल कोविड सेंटरमध्ये पुरवून पुरवून रेमडेसिविरचा वापर केला जात आहे. सध्या येथे केवळ ६५० च्या आसपास रेमडेसिविर उपलब्ध असून तो साठा एक दिवसपुरताच असून मागणी करूनही साठा उपलब्ध होत नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.लसीकरणाचा अतिरिक्त साठा उपलब्ध झाला असला तरीतोदेखील दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने शहरातील ५६ पैकी केवळ ४१ केंद्रांवरच लसीकरण सुरू असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

ऑक्सिजन -११४ मेट्रिक टनची मागणी, मिळतो ८० मेट्रिक टनचठाणे महापालिका हद्दीत महापालिकेच्या कोविड सेंटरबरोबर खासगी रुग्णालयात रोजच्या रोज किमान ११४ मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. परंतु, शहरासाठी रोज सुमारे ८० मेट्रीक टनचा ऑक्सिजनचा साठा मिळत आहे. पालिकेच्या गोल्बल कोविड सेंटरमध्ये रोजच्या रोज ४६ मेट्रीक गरज असताना येथे २० मेट्रीक टनच पुरवठा होत आहे. त्यामुळे पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमध्ये अद्यापही ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होऊ शकलेला नाही.

रेमडेसिविर - मागणी २ हजार, मिळाले एकही नाहीठाणे महापालिका हद्दीत रोजच्या रोज सुमारे २ हजार रेमडेसिविरची गरज आहे. परंतु, पालिकेकडे आता पुरवून पुरवून ६५० च्या आसपास रेमडेसिविरचा साठा शिल्लक राहिला आहे. महापालिकेने रोजच्या रोज १५०० रेमडेसिविरची मागणी केली आहे. तर खासगी रुग्णालयांसाठी ५०० च्या आसपास मागणी रोजची आहे. परंतु, खासगी रुग्णालयांना मागील आठ दिवसांपासून साठाच उपलब्ध झालेला नाही, तर महापालिकेलाही साठा उपलब्ध झालेला नाही.

लसीकरण - साठा नसल्याने केवळ ४१ केंद्रे सुरूठाणे महापालिकेला यावेळी ३५ हजारांचा लसींचा साठा मिळाला आहे. त्यानुसार हा साठादेखील योग्य पध्दतीने वापरण्याचे पालिकेचे नियोजन आहे. यापूर्वी पुरेसा साठा असताना पालिकेच्या माध्यमातून ५६ केंद्रावर लसीकरण सुरू होते. परंतु, आता पालिकेकडे कोवीशिल्डचा १४ हजार ८७० आणि कोव्हॅक्सीनचा ३ हजार डोसचा साठा शिल्लक असल्याने पालिकेने सध्या ४१ केंद्रांवरच लसीकरण सुरू ठेवले आहे.

पुढे काय?ठाणे शहरात सध्या ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे, एक एक दिवस पुरेल एवढाच साठा उपलब्ध होत आहे, रेमडेसिविरचा साठादेखील जवळजवळ संपुष्टात आला आहे. लसीकरणाचा साठादेखील दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच असल्याने पुढे काय, असा सवाल आता पालिकेला पडला असून साठा उपलब्ध व्हावा यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. ठाणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यानुसार ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, केवळ ग्लोबल रुग्णालयापुरताच रोजच्या रोज साठा उपलब्ध होत आहे. तर रेमडेसिविरचा साठादेखील एक दिवसापुरताच शिल्लक असून १८ एप्रिलनंतर साठा उपलब्ध होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आहे त्या साठ्यावर सध्या काम सुरू आहे.    - अश्विनी वाघमाळे, उपायुक्त, ठामपा 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस