शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा धक्का लागूनही घुबड वाचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 00:36 IST

जीवदान मिळाले

लोकमत न्यूज नेटवर्क माणगाव : गेल्या आठवड्यात उतेखोल येथील वाॅटर सप्लाय रोड परिसरात काही दिवसांच्या अंतराने अचानक सकाळच्या वेळी एकामागोमाग एक अशी दोन गव्हाणी घुबडे मेलेल्या अवस्थेत आढळली. प्राथमिक अंदाजानुसार सध्या चर्चेत असलेला बर्ड फ्ल्यू रोगाने किंवा विषारी उंदिर खाल्याने विषबाधेने कदाचित ती मृत होत असावीत असे वाटत होते; पण प्रत्यक्षात मात्र ती परिसरातील ‘महावितरण’च्या खांबावरील चिनी मातीच्या डिशवर बसल्याने विजेचा झटका बसल्याने खाली पडून मृत झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रत्यक्षदर्शी रवींद्र कुवेसकर बुधवारी रात्री दहा वाजता घरासमोरील रस्त्यावर फिरत असताना जवळच असलेल्या हायटेन्शन लाईनच्या खांबावर कसला तरी आवाज झाला. काहीतरी खाली पडल्याचे जाणवले पण काळोखात काही दिसत नव्हते. जवळ जाऊन पाहीले असता एक पूर्ण वाढ झालेले गव्हाणी घुबड फडफडताना दिसले, त्याच्या दिशेने दोन तीन भटकी कुत्री त्याला हुंगत आली. शाॅक लागल्याने त्याला उडता येत नव्हते. आता ती कुत्री त्याच्यावर झडप घालणार हे लक्षात आल्याने त्या कुत्र्यांना तिथून हाकलले आणि कुवेसकर यांनी आपला मुलगा शंतनूच्या मदतीने शाॅक लागुन पडलेल्या घुबडाला उचलले व घराच्या अंगणात उजेडात आणले.त्याचे निरिक्षण केले असता त्याला जखमा झाल्या नव्हत्या. मात्र, झटका लागल्याने त्याचे संपूर्ण शरीर धडधडत होत. जवळपास एक तास घुबडावर लक्ष ठेऊन नंतर त्याला पाणी पाजून, समोरील चार मजली इमारतीच्या गच्चीवर घुबडांचे वास्तव्य असलेल्या कोनाड्यात त्याला सुरक्षित सोडले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई