ठाणे : दलित व मुस्लिम यांना एकत्र आणण्यासाठी एमआयएमचे असरूद्दीन ओवेसी आणि भारीपचे प्रकाश आंबेडकर एकत्र आले. पण दलित आणि मुस्लिम त्यांच्या दोघांबरोबरही नाही. यामुळे त्यांचा काहीही फायदा होणार नाही. देशाच्या राजकारणावरही त्याचा परिणाम दिसणार नसल्याचे केंद्रीय समाज कल्याणमंत्री रामदास आठवले यांनी ठाणे येथे स्पष्ट केले.आरपीआयचा ६१वा वर्धापन दिन ठाण्यातील ढोकाळी मैदानावर घेणार आहेत. त्यासाठी या मैदानाची पहाणी करण्यासाठी आठवले शनिवारी स्वत: ठाण्यात आले. त्याप्रसंगी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आंबेडकरांबरोबर दलित नाही आणि मुस्लिम ओवसी यांच्या बरोबरही नाही. दलित व मुस्लिम दोन्ही माझ्या बरोबर आहे. यामुळे एकत्र येऊनही या दोघांचा फायदा होणार नसल्याचे आठवले यांनी सांगितले.देशाच्या संरक्षणासाठी ३० हजार कोटींचे राफेल हे लढावू विमान खरेदी करण्याची गरजच होती. त्याच्या खरेदीसाठी एखाद्या कंपनीची मध्यस्थिती आवश्यकच होती. अनिल अंबानीच्या कंपनीने ती मध्यस्थि केली. त्यात त्यांचाफायदा झाला. तो त्यांना मिळावा असा काही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हेतू नव्हता. राफेल खरेदीची बदनामी करण्यासाठी कॉग्रेस अध्यक्ष झाल्यापासून खासदार राहूल गांधी परत परत तोच तोच मुद्दा काढून टिका करीत आहे. पण ही टिका मोंदींना पचवण्यार असून राहूल गांधींना त्याचा काही फायदा होणार नाही. या लढावू विमानांचा फायदा आता पाकिस्थानशी युध्द करण्यासाठी होणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यांना १६ टक्के आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व प्रयत्न करीत आहेत. पण आरक्षणाचा हा मुद्दा न्यायालयात टिकरणार नाही. घटनेनुसार ५० टक्केच्यावर आरक्षण देता येत नाही. यामुळे आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात टिकणार नाही. मराठ्याना आरक्षण देण्यासाठी प्रथम लोकसभेत कायदा करून आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करायला पाहिजे. तरच आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात टिकेल. मराठ्यांन प्रमाणेचेगुजरात, हरिणात आदी ठिकाणी आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहे. त्यांनाही या कायद्यामुळे आरक्षण मिळवून देता येणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदर उदयन राजे यांच्या भेटीसही खासदार राजू शेट्टी यांची कॉग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाण्याची तयारी, पेट्रोल- डिझेल भाव वाढ कमी करण्यासाठी केंद्र व राज्यांनी कर कमी करणे, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातील हिंदुराष्ट्र विषयीचा चांगला बदल, राम मंदीर आदी विषय आठवले यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ओवेसी - प्रकाश आंबेडकर एकत्र येऊनही फायदा नाही - आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 20:27 IST
आरपीआयचा ६१वा वर्धापन दिन ठाण्यातील ढोकाळी मैदानावर घेणार आहेत. त्यासाठी या मैदानाची पहाणी करण्यासाठी आठवले शनिवारी स्वत: ठाण्यात आले. त्याप्रसंगी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आंबेडकरांबरोबर दलित नाही आणि मुस्लिम ओवसी यांच्या बरोबरही नाही.
ओवेसी - प्रकाश आंबेडकर एकत्र येऊनही फायदा नाही - आठवले
ठळक मुद्देआंबेडकरांबरोबर दलित नाही आणि मुस्लिम ओवसी यांच्या बरोबरही नाहीसंरक्षणासाठी ३० हजार कोटींचे राफेल हे लढावू विमान खरेदी करण्याची गरजचपण आरक्षणाचा हा मुद्दा न्यायालयात टिकरणार नाही