शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या प्रेमामुळे भारावलो - सोनवणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 22:24 IST

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांची राज्याच्या आदिवासी विकास आयुक्तपदी पदोन्नती झाली आहे.

ठाणे :  गेली  दीड वर्ष ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी काम करताना ग्रामीण भागातील नागरिकांना विविध पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेने दिलेल्या प्रेमामुळे आज मी भारावलो आहे असे भावोद्गार ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी निरोप समारंभा प्रसंगी काढले. त्यांची राज्याच्या आदिवासी विकास आयुक्तपदी पदोन्नती झाली आहे.

       माझी नाळ ही ग्रामीण, आदिवासी जनतेशी जोडली गेलेली आहे. सामान्य नागरिकांना न्याय देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. त्यामुळे आयुक्तपदी काम करताना देखील आदिवासी बांधवासाठी जे जे करता येईल, त्यासाठी मी प्रयत्नशील राहील असे ही  त्यांनी सांगितले. ठाणे ग्रामीण भाग हा खूप मोठा भाग आहे. मात्र जिल्ह्यात काम करताना माझ्या सहकारी अधिकारी वर्गाने मोलाची साथ दिली. त्यामुळेच विविध विकास कामांमध्ये ठाणे ग्रामीण राज्यात अग्रेसर राहू शकला. माझ्या सहकार्याचा मला सार्थ अभियान असल्याचे ते म्हणाले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, चंद्रकांत पवार, छायादेवी शिसोदे आदींसह कार्यकारी अभियंता नितीन पालवे, एच. एल. भस्मे, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे, आदी उपस्थित होते.