भिवंडी : प्रियकराबरोबर शय्यासोबत करण्यासाठी लॉजमध्ये आलेल्या महिलेने सेक्सपॉवर वाढविण्यासाठी घेतलेल्या इंजेक्शनचा ओव्हरडोस तीच्या मृत्युचे कारण बनल्याची घटना शहरातील अशोका लॉजमध्ये घडली असून या महिलेचा इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांत मृत्यु झाल्यानंतर मृत्युचे कारण स्पष्ट झाले आहे.शबीना उर्फ ममता (२९)(बदललेले नांव)असे मृत महिलेचे नांव असुन ती मुंब्रा येथील अमृतनगरमध्ये रहात होती. ती विवाहित असून तीला दोन अपत्ये आहेत. मुंब्रा येथुन ती रविवारी शहरातील कल्याणरोड येथे अशोक लॉजमध्ये अमजद (बदललेले नांव)नावाच्या प्रियकराबरोबर आली होती. तेथे तीने सेक्सपॉवर वाढविणारे इंजेक्शन घेतले.त्यामुळे तीची प्रकृती अचानक बिघडली.दरम्यान सोबत असलेल्या प्रियकर तीला त्याच अवस्थेत सोडून लॉजमधून निघून गेला. तीचा जोडीदार परत न आल्याने, त्याची खातरजमा करण्यासाठी अशोक लॉजच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रूमचा दरवाजा उघडला.तेंव्हा शबीना ही बेशुध्दावस्थेत असल्याचे आढळून आले.या कर्मचाºयांनी तीला बेशुध्दावस्थेत स्व.इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांत उपचारासाठी दाखल केले. रूग्णालयांतील डॉ. समय्या शमीम अन्सारी यांनी तीच्यावर उपचार करून शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न केला. परंतू तीच्या प्रकृतीत सुधार होत नव्हता. बेशुध्दावस्थेत तीने डॉक्टरांना आपल्या घराचा कसाबसा पत्ता सांगीतला. तीच्यावर उपचार सुरू असताना तीचा रूग्णालयांतच मृत्यु झाला.या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन तीच्या मृत्युस कारणीभूत असलेल्या इसमाचा शोध पोलीस घेत आहेत.
ओव्हरडोस इंजेक्शन बनले तिच्या मृत्यूचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 22:56 IST
भिवंडी : प्रियकराबरोबर शय्यासोबत करण्यासाठी लॉजमध्ये आलेल्या महिलेने सेक्सपॉवर वाढविण्यासाठी घेतलेल्या इंजेक्शनचा ओव्हरडोस तीच्या मृत्युचे कारण बनल्याची घटना शहरातील अशोका लॉजमध्ये घडली असून या महिलेचा इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांत मृत्यु झाल्यानंतर मृत्युचे कारण स्पष्ट झाले आहे.शबीना उर्फ ममता (२९)(बदललेले नांव)असे मृत महिलेचे नांव असुन ती मुंब्रा येथील अमृतनगरमध्ये रहात होती. ती ...
ओव्हरडोस इंजेक्शन बनले तिच्या मृत्यूचे कारण
ठळक मुद्दे इंजेक्शनचा ओव्हरडोस तीच्या मृत्युचे कारण बनलेतीने सेक्सपॉवर वाढविणारे इंजेक्शन घेतले होतेकर्मचा-यांनी तीला बेशुध्दावस्थेत केले रूग्णालयांत दाखल