शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

जिल्ह्यात सात लाखांवर वाहने; प्रदूषण चाचणीत अडीच हजार वाहनांनाच दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 23:44 IST

आठ महिन्यांत २२,८२३ वाहनांची तपासणी : १० लाख ५३ हजारांचा दंड वसूल

जितेंद्र कालेकरठाणे : गेल्या पाच वर्षांत ठाणे जिल्ह्यात ५,२३,०४१ वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली. प्रत्यक्षात वाहनांची संख्या ही सात लाखांहून अधिक आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये ठाणे, कल्याण, नवी मुंबईत २२,८२३ वाहनांची प्रदूषण चाचणी झाली. यातील दोषी २,३३४ चालकांकडून १०,५३,८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

नवीन वाहन सुरुवातीला काही वर्षे सुरळीत चालते. परंतु, कालांतराने त्याची प्रदूषण चाचणी करणे गरजेचे आहे. वाढत्या वाहनांच्या तुलनेत जिल्हाभर २६१ पीयूसी केंद्रे आहेत. कारसाठी १०० तर दुचाकीसाठी ५० रुपयांतही चाचणी होते. एप्रिल ते नोव्हेंबर २०२० दरम्यान ठाण्यात १८,९२०, कल्याणमध्ये २,६९२ तर, नवी मुंबईत १,२११ वाहने आरटीओच्या अधिकाऱ्यांनी तपासली. यामध्ये २,३३४ वाहने दोषी आढळली. ठाण्यातील १,२९७ दोषी चालकांकडून ६,७७,९०० रुपये, कल्याणमध्ये ५६६ जणांकडून १,१९,२०० रुपये तर नवी मुंबईमध्ये ४७१ जणांकडून २,५६,००० दंड वसूल केला आहे.

पीयूसी न करणाऱ्यांना एक हजाराचा दंडप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायू पथकाने किंवा वाहतूक पोलिसांनी जर एखादे वाहन पकडले अन् त्यात ते दोषी आढळले तर संबंधितांवर एक हजार रुपये दंडाची कारवाई केली जाते. अनेकदा वाहन पकडल्यानंतर पीयूसी नसेल तर वाहनचालकांना ते सादर करण्याची सात दिवसांची मुदत दिली जाते. तरीही ते सादर केले नाही, तर ही दंडात्मक कारवाई होते, अशी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली. 

वाहनाची प्रदूषण चाचणी करणे आवश्यक आहे. मर्यादेपेक्षा वाहनांतून जास्त धूर निघत असेल तर वायुप्रदूषणात वाढ होते. त्यामुळे श्वसन, फुप्फुसाशी निगडित विकारांचा संभव असतो. परिणामी, प्रत्येक वाहनाचे प्रदूषण नियंत्रणात राहण्यासाठी शासनाने पीयूसी बंधनकारक केले आहे. ते नसल्यास कलम ११५ तसेच १९० अंतर्गत एक हजार रुपयांचा दंड आकारला जातो. प्रसंगी वाहन जप्तीचीही कारवाई होते.- विश्वंभर शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे.