शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मोखाड्यामध्ये नागली, भातपिकावर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 00:27 IST

शेतकरी धास्तावले : हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती, मुसळधार पावसाचा परिणाम

जव्हार : मोखाडा तालुक्यात खरिपात भात, नागली आणि वरई ही मुख्य आणि नगदी पिके घेतली जातात. सततच्या मुसळधार पावसामुळे भातावर बगळ्या तर नागली पिकावर बेडक्या आणि खैºया रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतातच हे पीक आडवे होऊ न ते कुजू लागले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाणार असून धान्याऐवजी हाती पेंढाच येणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मोखाड्यात खरिपाच्या एकूण १३ हजार हेक्टर शेतीच्या चार हजार ५०० हेक्टर नागली, तर भाताचे दोन हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. येथील आदिवासी शेतकऱ्यांना एकमेव खरीप पिकाचाच उदरनिर्वाहासाठी आधार आहे. अन्य कुठलेही उत्पन्नाचे साधन नाही. सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने पोटरीत आलेल्या ( लोंब येण्याची वेळ ) पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.मुख्य नगदी पीक असलेल्या नागलीवर बेडक्या आणि खैºया तर भातपिकावर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उभे पीक आडवे होऊन जमीनदोस्त होऊ लागले आहे. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. यापुढे सतत कोसळधार सुरू राहिल्यास हातातोंडाशी आलेले पीक वाया जाऊन शेतकºयांच्या हाती गवताचा पेंढा येणार आहे.नागली व भाताचे पीक चांगले बहरले होते. मात्र, सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने या पिकांवर बगळ्या, बेडक्या आणि खैºया हा रोग पडला आहे. कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी ही पिकांची पाहणी केली आहे. त्यामुळे या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी.- दिलीप जागळे,शेतकरी व माजी सरपंच, गोमघर-डोंगरवाडी 

टॅग्स :thaneठाणे