शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास नागरिकांचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:27 IST

कल्याण : डोंबिवलीच्या ग्रामीण भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांसोबत मनसे आमदार राजू पाटील यांनी बुधवारी केडीएमसी आणि ...

कल्याण : डोंबिवलीच्या ग्रामीण भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांसोबत मनसे आमदार राजू पाटील यांनी बुधवारी केडीएमसी आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी लवकरात लवकर पाणीप्रश्न सुटला पाहिजे, अशी मागणी केली. इतकेच नाही तर अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही तर एका दिवशी नागरिकांचा उद्रेक होईल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

डोंबिवली पूर्वेतील काही परिसरात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. नांदिवली टेकडी, देसलेपाडा, भोपर, सागाव परिसराला पाणीटंचाई भेडसावत आहे. तेथे कधी पाणी येते, तर कधी येत नाही. अनेकदा पाण्याचा दाबही कमी असतो. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तासन्‌तास पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. यासंदर्भात पाटील यांनी केडीएमसी अधिकारी आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांची बैठक डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात घेतली. यावेळी उपस्थित असलेले नागरिक संतप्त झाले. पाणी कमी दाबाने का येते? औद्योगिक भागातील कंपन्यांना पाणी मिळते, मग नागरिकांना का मिळत नाही, असे प्रश्न त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना विचारले. त्यावर लवकरात लवकर ही समस्या सुटली पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

याबाबत पाटील म्हणाले, ‘‘सात दिवसांत नागरिकांना दिलासा मिळणार आहे. येत्या डिसेंबरपर्यंत एक लाइन टाकण्याचे काम पूर्ण होईल. त्याचबरोबर अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्यानंतर पाणीप्रश्न सुटेल, अशी आशा आहे; मात्र पाणीप्रश्न सुटला नाही तर नागरिकांचा उद्रेक होईल.

ब्रेकडाऊनमुळे समस्या

याबाबत एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता कालीदास भांडेकर यांनी सांगितले की, केडीएमसीचे अभियंता आणि एमआयडीसीचे अभियंता संयुक्त पाहणी करतील. दुर्दैवाने दोन तीन वेळा ब्रेकडाऊन झाल्याने पाण्याचा प्रश्न उद्भवला. लवकर ही समस्या सुटेल.

-------