शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा हंडा-कळशी मोर्चा काढावा लागेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST

डोंबिवली : एमआयडीसीकडून शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. त्याचा परिणाम शनिवार आणि रविवारच्या पाणीपुरवठ्यावर होतो. काही ठिकाणी पाणी अत्यंत ...

डोंबिवली : एमआयडीसीकडून शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. त्याचा परिणाम शनिवार आणि रविवारच्या पाणीपुरवठ्यावर होतो. काही ठिकाणी पाणी अत्यंत कमी दाबाने येते तर काहींना पाणीच मिळत नाही. हा त्रास वर्षभर सुरू असल्याने रहिवाशांमध्ये रोषाचे वातावरण आहे. याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास हंडा-कळशी मोर्चा काढावा लागेल अथवा ‘रास्ता रोको’ आंदोलन करावे लागेल, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

एमआयडीसीकडून होणारा पुरवठा शुक्रवारी बंद होता. त्यामुळे शनिवार आणि रविवारी पाणीपुरवठा कमी दाबाने झाला. ही समस्या वर्षभर असून काहींना पाणी मिळत नसल्याकडे सुदर्शननगर निवासी संघाचे सचिव विवेक पाटील यांनी लक्ष वेधले आहे. परिसरातील परिचय, मित्रधाम, नव जयश्री, पुरुजीत या सोसायट्यांसह अन्य सोसायट्यांना शुक्रवारपासून पुढील तीन दिवस पाणीच येत नसल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. दोन ते तीन महिन्यांपासून संबंधित सोसायट्यांतील रहिवासी एमआयडीसी कार्यालयातील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार करत आहेत. प्रत्येकवेळी काहींना काही कारणे देऊन तक्रारींची गंभीर दखल घेतली जात नाही. ज्या सोसायट्यांत पाण्याची समस्या आहे, त्यांच्यासाठी एमआयडीसीकडून पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र जलवाहिनी टाकून दिली जाईल व त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले होते. आरएक्स २१, आरएक्स २२ आणि आरएक्स २३ साठी जलवाहिनी टाकलेली नाही, ज्या सोसायटीसाठी जलवाहिनी टाकली त्यांनाही अद्याप पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नाही, असे पाटील यांचे म्हणणे आहे. पाण्याविना रहिवाशांचे हाल सुरू असून एमआयडीसीमध्ये राहत असूनही पिण्यासाठी बाहेरून बाटलीबंद पाणी व टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. ही शरमेची बाब असल्याचे पाटील यांनी एमआयडीसीला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

----------------------------------------

गृहसंकुलात पाणीटंचाई

कल्याणनजीकच्या आंबिवली परिसरातील स्वराज नेपच्युन या गृहसंकुलातील रहिवाशांनाही वर्षभरापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गृहसंकुलात दोन सेक्शन आहेत. एकामध्ये सात माळ्यांचे १० टॉवर आहेत. वर्षभरापूर्वी एक तास पाणी यायचे, ते मुबलक होते. पण काही महिन्यांपासून १० ते १५ मिनिटेच पाणी येते तेही एकदिवसाआड येत असल्याने तीव्र पाणीटंचाई भेडसावत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

------------------------------------------------------