शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा कायदेशीर कारवाई करणार

By admin | Updated: February 3, 2017 03:12 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका प्रस्तावित असतानाही आजवर सरकारने यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका प्रस्तावित असतानाही आजवर सरकारने यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी डोंबिवलीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्घाटनाला येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखवले जाणार आहेत. मात्र, मानपाडा पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांना नोटीस बजावली आहे. आंदोलन छेडल्यास कायदेशीर कारवाई करू, असा इशारा दिला आहे.२७ गावे केडीएमसीतून वगळण्यासंदर्भात सर्व पक्षांच्या संघर्ष समितीला दिलेले आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळावे. साहित्य संमेलनापूर्वी याप्रकरणी ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा, संमेलनस्थळी त्यांचे स्वागत काळे झेंडे दाखवून करू, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी नोव्हेंबरमध्ये डोंबिवलीत झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात दिला होता. दरम्यान, २७ गावे न वगळल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. शुक्रवारी संमेलनाच्या उद्घाटनाला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पाटील यांनी यासंदर्भात ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पत्र पाठवून परवानगी मागितली होती. त्यावर, मानपाडा पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. (प्रतिनिधी)संघर्ष समिती कोमात, राष्ट्रवादी जोमात २७ गावांचा स्वतंत्र नगरपालिकेसाठी लढा देणारी संघर्ष समिती या राष्ट्रवादीच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने कोमात गेल्याचे चित्र आहे. संघर्ष समितीचे उपाध्यक्ष असलेले गुलाब वझे हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. त्याचबरोबर आयोजक संस्थेचे अध्यक्षही आहेत. विशेष म्हणजे वझे हे राष्ट्रवादीचे पदाधिकारीही आहेत. एकीकडे संमेलनाचे आयोजक, तर दुसरीकडे राष्ट्रवादीने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे वझे यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.