शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथकरांसाठी यंदाही शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन

By admin | Updated: April 29, 2017 01:31 IST

येथील प्राचीन शिव मंदिराच्या कलाकृतीचा प्रचार आणि प्रसारासाठी शिवसेनेच्या वतीने २०१५ पासून शिव मंदिर महोत्सव होत आहे.

अंबरनाथ : येथील प्राचीन शिव मंदिराच्या कलाकृतीचा प्रचार आणि प्रसारासाठी शिवसेनेच्या वतीने २०१५ पासून शिव मंदिर महोत्सव होत आहे. यंदा हा महोत्सव ५ ते ७ मे दरम्यान होणार आहे. महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांसोबत स्थानिक कलाकारांनाही आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या वर्षी हा महोत्सव दुष्काळामुळे रद्द केला होता. मात्र, यंदा हा महोत्सव पहिल्या वर्षापेक्षा दिमाखदार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यंदाच्या महोत्सवात कला, संगीत यांच्यासोबतच इतर कलाकारांनाही आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ५ मे रोजी होणार असून आपल्या अक्षरांच्या जादूने रसिकांना खिळवून ठेवणारे अच्युत पालव यांच्या सादरीकरणाने उद्घाटन होईल. या वेळी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या गायनाचा कार्यक्र म रंगणार आहे.दि.६ मे रोजी गझल गायक रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड यांचा कार्यक्र म होईल. शेवटच्या दिवशी म्हणजे ७ मे रोजी प्रसिद्ध संगीतकार सलीम-सुलेमान उपस्थित राहणार आहेत. यामुळे संगीतप्रेमींसाठी अनोखी पर्वणी असेल. या मुख्य कार्यक्र मासोबतच लहान मुलांना विविध खेळांची प्रात्यक्षिके, साहसी खेळ पाहता आणि अनुभवता येणार आहेत. शिव मंदिराशेजारील जागेत एक कृत्रिम तलाव तयार करून त्यात परदेशांतील मासे पाहायला मिळणार आहेत. तसेच येथे एक रंगमंचही तयार करण्यात येणार असून तरुण पिढीच्या मनावर नाव कोरणाऱ्या नऊ प्रसिद्ध रॉक बॅण्डचे सादरीकरण या ठिकाणी होणार आहे. महोत्सवस्थळी प्रवेशद्वाराजवळच देशातील प्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. शिल्पकारही आपल्या शिल्पकलेचे सादरीकरण करणार आहेत. या वेळी प्रेक्षकांना आवडत्या चित्रांची आणि शिल्पांची खरेदीही करता येणार आहे. खवय्यांसाठी खाद्यमेळाही असेल. (प्रतिनिधी)