शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘ठाणे महानगरपालिका स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन करा ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 23:28 IST

नियमाप्रमाणे ताबडतोब स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी हणमंत जगदाळे, नम्रता कोळी आणि विक्र ांत चव्हाण आदी पाच सदस्यांनी सभापती राम रेपाळे यांच्याकडे केली आहे

ठळक मुद्देसदस्यांचे सभापती राम रेपाळे यांना पत्र हणमंत जगदाळे, नम्रता कोळी आणि विक्र ांत चव्हाण आदींचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक तात्काळ आयोजित करण्यासंदर्भात हणमंत जगदाळे, नम्रता कोळी, विक्र ांत चव्हाण, भरत चव्हाण आणि कृष्णा पाटील आदी पाच सदस्यांनी समितीचे सभापती राम रेपाळे यांच्याकडे पत्राद्वारे सभा आयोजित करण्याची मागणी केली आहे.वास्तविक, नियमाप्रमाणे पाच स्थायी समिती सदस्यांचे पत्र दिल्यानंतर स्थायी समितीची बैठक आयोजित करणे क्र मप्राप्त होते. परंतू तशी बैठक लावण्यात आलेली नाही. त्यामुळे २० मे २०२० रोजीच्या स्थायी समिती बैठकीमध्ये केलेल्या चर्चेप्रमाणे दर आठवडयाला बैैैठक आयोजित करण्याची चर्चा करून निर्णय घेण्यात आला. तरीही स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले नाही. सध्याच्या कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधी आपल्या विभागात सातत्याने कार्यरत आहेत. परंतू, हे काम करीत असताना बऱ्याच ठिकाणी अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्याचा त्रास सामान्य नागरिकांनाही सहन करावा लागत आहे.इतर शहरांमध्ये अशा प्रकारच्या बैठकींचे आयोजन करून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र काम करीत असल्याचे पहायला मिळत आहे. परंतू, ठाणे शहरात तसे दिसत नाही. हीच बाब लक्षात घेऊन नियमाप्रमाणे ताबडतोब स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी या पाच सदस्यांनी केली आहे.

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिका